Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : खा. प्रतिभा धानोरकर

आंदोलन करीत एम्टा कोळसा खाण पाडली बंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       बरांज या गावाचे नियमानुसार पुनर्वसन करावे, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, या प्रमुख मागण्यांसह अन्य 16 मागण्यांना घेऊन काँग्रेस पक्षातर्फे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात दिनांक 19 रोज बुधवार ला सकाळी 11 वाजता बरांज येथील कर्नाटक एम्टा खाण परीसरात आंदोलन करीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी व प्रकल्पग्रस्तांनी कोळसा खाणितील कामकाज बंद पाडले. जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या संपूर्ण मागण्या कंपनीतर्फे पूर्ण केल्या जात नाही तोपर्यंत खाणीतील कामकाज बंदच राहिल असा इशारा यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी खाण व्यवस्थापनाला दिला. बरांज येथील प्रकल्पग्रस्तांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, प्रकल्पग्रस्तांच्या मागे मी व काँग्रेस पक्ष भक्कमपणे उभा आहे असे आश्वासनही यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रकल्पग्रस्तांना दिले. सहा महिन्यांपूर्वी तत्कालीन आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात खाण परिसरात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले होते.

त्यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी खाण व्यवस्थापनाला सहा महिन्यांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. सहा महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सदर आंदोलन उभारून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कंपनी अधिकाऱ्यांशी बोलणी करून मागण्यांच्या पूर्ततेबद्दल ऊपस्थीत कंपणी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता प्रकल्पग्रस्तांची एकही मागणी पूर्ण करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते व प्रकल्पग्रस्तांनी कर्नाटका एम्टा कंपनीच्या विरोधात नारबाजी करीत खाणीतील कामकाज बंद पाडले.त्यानंतर कांग्रेस कार्यकर्ते व प्रकल्पग्रस्तांनी कंपणी विरोधात नारेबाजी करीत खाणीतील कामकाज बंद पाडले.

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या आंदोलनात माजी नगराध्यक्ष अनील धानोरकर, कांग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, शहर अध्यक्ष सुरज गावंडे, महिला शहर अध्यक्षा सरिता सूर, प्रमोद नागोसे, प्रशांत झाडे, राजु डोंगे, चंद्रकांत खारकर, किशोर हेमके, संध्या पोडे, ईश्वर निखाडे, प्रमोद गेडाम,विलास टिपले,संदीप कुमरे,रितेश वाढइ,शीवाणी कोंबे,कविता सुपी,राजु चिकटे, अजीत फाळके, महेश कोथळे, लता इंदुरकर, वसंता ऊमरे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

काँग्रेस खासदार धानोरकर यांच्या भावाकडून कर्नाटक एम्टाच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ व कार्यकर्त्यांकडून मारहाण

नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समोरच त्यांच्या कार्यकर्त्यांनी खासगी कोळसा खाणीच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे शिवीगाळ करण्यात खासदार धानोरकर यांचे सख्खे भाऊ प्रवीण काकडे पुढे होते, असाही आरोप करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये