ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकप्रिय सण ‘बैलपोळा’ व शेतकरी पुत्र किशोर टोंगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य बैलजोडी सजावट स्पर्धा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

या देशाच्या अर्थव्यवस्थेत आपलं योगदान देण्यासाठी शेतकऱ्यांच्या सोबत कष्ट करणारा त्याचा सखा म्हणजे त्यांचे बैल आणि या बैलांच्या ऋणातून उतराई होण्याचा सण म्हणजे बैल पोळा!
आपल्या जिवापेक्षा आपल्या बैलांना आमचा शेतकरी जीवापाड जपतो ही आमची संस्कृती आहे.

बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना गोड धोड खाऊ घालन्याबरोबरच त्याची सजावट करतो, गावात मिरवणूक काढतो आणि आपल्या आप्तेष्टासह आपला आनंद साजरा करत असतो.

यावर्षी आम्ही देखील या सणाच्या निमित्ताने आपल्या आनंदात सहभागी होण्याचे ठरविले असून उत्कृष्ट बैलजोडी सजावटीला बक्षीस देण्याचे ठरविले आहे. आपण या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा.
स्पर्धेचे नियम व निकष:
1) बैल पोळ्याच्या दिवशी आपल्या लाडक्या बैल जोडीची चांगली सजावट करून चांगल्या दर्जाचा स्वतः सह मोबाईल किंवा कॅमेऱ्यात फोटो काढावा.

2) सदर फोटो खालील मोबाईल क्रमांकावर आम्हाला व्हाट्सअप करण्यात यावा. सोबत आपले पूर्ण नावं, गावाचे व तालुक्याचे नावं लिहून संपर्क क्रमांक लिहावा.

3) फोटो पाठविण्याची वेळ 14 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दुपारी 2 वाजेपर्यंत असेल. यानंतर पाठविलेले फोटो ग्राह्य धरण्यात येणार नाही.

4) सदर फोटोची निवड समिती मार्फत छाननी करून विधानसभा क्षेत्राकरिता पाच बक्षीसे जाहीर करण्यात येईल.

5) फोटो बघून उत्कृष्ट बैलजोडी निवडण्याचे सर्वाधिकार निवड समितीला असेल.

6) उत्कृष्ट बैल जोडी मालकाला वरोरा येथील जन संपर्क कार्यालयात भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात येईल.

7) ही स्पर्धा आमच्या शेतकरी बांधवांचं आपल्या बैलजोडी विषयी असेल्याला प्रेमाला वृद्धिंगत करण्यासाठी आमचा छोटासा प्रयत्न आहे. आपल्या सुखदुःखाच्या इतरही क्षणात आम्ही सदैव आपल्या ठामपणे सोबत आहोत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये