ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ज्ञानगंगा नित्यानंद आश्रमात शिवलिंग अभिषेक सोहळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

ज्ञानगंगा नित्यानंद आश्रम सेवा संस्था आणि गोसेवा केंद्र कोलांडी/ नंदप्पा येथे परमपूज्य बालयोगी श्री गजेंद्र चैतन्य महाराज शांतीधाम मदापूरी तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला यांच्या पावन सानिध्यात 151जोड्यांच्या हस्ते शिवलिंग अभिषेक सोहळा 10 सप्टेंबर ला मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्य क्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री घोडके साहेब (पीएसआय पोलीस स्टेशन पाटण)कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री अशोक रावजी बावणे, गडचांदूर,श्री बालाजी पांडुरंग पुरी गडचांदूर श्री शरद भाऊ जोगी,उपनगराध्यक्ष गडचांदुर श्री उद्धव दीपक पुरी गडचांदूर श्री प्रशांत भाऊ गोखरे गडचांदूर श्री पानपटे साहेब श्री बिंदेवाड साहेब फॉरेस्ट डिपार्टमेंट गडचांदूर श्री सुरेश जी केंद्रे आंबेझरी श्री टीकाराम चिव्हाने गडचांदूर गोविंद टोकरे जिवती, उत्तम कराडे जिवती, हरिचंद्र जाधव पुड्याल मौदा, श्री किरण पवार डंपर मोहदा, श्री गोविंदराव घोंगडे नार पठार, श्री गायकवाड साहेब एम ई सी बी जिवती सौ नयना संदीप शिंदे सरपंच खडकी श्री गणेश वाघमारे उपसरपंच कोलांडी,श्री कोंबले साहेब पोलीस पाटील कोलांडी आणि परिसरातील 400 ते 500 भक्तांची उपस्थिती होती.

परमपूज्य बालयोगी गजेंद्र चैतन्य महाराज यांचे श्री धर्मराजजी पारधे शामल ताई पारधे या दापंत्यांच्या हस्ते गुरुपुजन आश्रमाच्या कमिटीच्या हस्ते शाल श्रीफळ व मंदिराची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला तसेच महाराजांनी आपल्या वाणीतून भक्तांना आध्यात्मिक जीवनाविषयी सेवेबद्दल कार्याबद्दल जीवनशैलीबद्दल संबोधन केले आश्रमाच्या निसर्गरम्य वातावरनाची प्रशंसा केली महाराज आनंदी झाले तसेच आश्रमा तर्फे सच्चिदानंद गुरुकिल्ली पुस्तकाचे निशुल्क वितरण करण्यात आले तसेच हिमालय प्रदेशातील शिव रुद्राक्ष बीज विक्रीसाठी ठेवले होते त्या पैकी 200 शिव रुद्राक्ष विक्री करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष श्री शंकर रावजी देवाळकर यांनी आश्रमाविषयी व कार्याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन श्री संतोषजी पोडे यांनी केले तसेच या कार्यक्रमाला यशस्वी आश्रमाचे सेवेकरी श्री शंकरराव देवाळकर,श्री बळीराम हेपट,श्री अनिल भाऊ वडस्कर,श्री धर्मराज पारधे,श्री अशोक केवट,श्री संतोष भाऊ झाडे,श्री संतोष पोडे,श्री नंदकिशोर चिडे,श्री प्रदीप कुंभे,श्री महेंद्र हांस्कर श्री संजय शिंदे,श्री केशव वाघमारे,श्री विजय हनुमंते,श्री वसंता भाऊ काळे श्री मारुती बुटले,श्री अजय सिडाम प्रवीण माणूसमारे, शरद बोधाले श्री विनायक मालेकर,श्री विठ्ठल कुचनकर श्री.दिनकर काळे, सौं.नंदाताई देवाळकर,सौ.शुभांगी हेपट,सौ.आशाताई झाडे,सौ.शामल पारधे, मंदा वडस्कर सौ अनुराधा शिंदे,श्रीमती. पार्वता हेपट,श्रीमती शोभा हुल्के,प्रतिभा सिडाम,सौ शकुन काळे,सौ छाया काळे,तसेच इतर सर्व कार्य कर्त्यानी कार्य क्रमाला यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले तसेच भक्तांना महाप्रसाद श्री भिमराव नामपल्ले कोलांडी,व श्रीमती अनिता ताई पोतले रा.कुकुडसाथ,यांच्या सहकार्यातून वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये