ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जादूटोणा केल्याच्या संशयावरून घरावर हल्ला, जीवे मारण्याची धमकी

पोलिसांच्या कारवाई विरूध्द दिला उपोषणाचा इशारा*

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संजय पडोळे

मूल : घरासमोर रस्त्यावर लिंबु टाकुन जादूटोणा करीत असल्याचा आड घेवुन आपल्या घरावर जमावासह चालुन येवुन अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पोलीस स्टेशन मूल येथे नोंदविलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दखलपात्र गुन्हयाची नोंद न करता अदखलपाञ गुन्हाची नोंद करून घरावर हल्ला करून कुटूंबाला वाडीत टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंडळीना संरक्षण दिल्या जात असल्याचा आरोप गुज्जनवार कुटूंबियांनी केला आहे.

स्थानिक पञकार भवनात घेतलेल्या पञकार परीषदेत बोलतांना राधेश्याम गुज्जनवार यांनी घरावर हल्ला करणाऱ्या मंडळीपासुन कुटूंबियांना धोका असल्याने पोलीसांनी संरक्षण द्यावे. अशी मागणी केली आहे.
येथील विहीरगांव परीसरातील वीर सावरकर वार्ड क्रमांक १२ मध्ये राधेश्याम गुज्जनवार आपल्या कुटुंबासह राहतात. रोजच्या मोलमजूरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. २६ ऑगस्ट रोजी रात्रो ८.३० वाजताचे दरम्यान वार्डातील ३० ते ४० लोकांच्या जमावाने त्यांच्या घरावर हल्ला चढविला. जेवण करीत असलेल्या कुटुंबानी बाहेर येवून बघीतले असता ३० ते ४० जणांचा जमाव त्यांच्या घरासमोर येवुन त्यांना अश्लिल शब्दात शिविगाळ करीत बाहेर निघण्याचे आवाहन करीत होते. कारण नसतांना अचानक जमावासह घरावर चालुन येवुन शिवीगाळ करीत होते. त्यामुळे कारण समजुन घेण्यासाठी कुटूंबातील काही मंडळी घराबाहेर पडून विचारत असतांना जमावातीला काही जणांनी आम्हाला धक्काबुक्की करत मारहाण केली. जवळपास एक तासापर्यंत जमावांचा राडा घरासमोर सुरू असताना राड्याचे कारण विचारले असता जमावाने आमच्या कुटूंबावर घरासमोरच्या रस्त्यावर लिंबु ठेवुन जादुटोणा करीत असल्याचा आड घेतल्याचे समजले.

आमच्या कुटूंबात कोणालाही जादुटोणाची विद्या येत नसुन आमचा जादुटोणा आणि अंधश्रध्देवर विश्वास नाही. आमचे घरही वार्डाच्या एका बाजुला असुन रोजमजुरी करून जीवन जगणारे आहोत. असे असताना वार्डातील मंडळीकडून आमच्यावर जादुटोणा करण्याचा आड घेवुन घरावर हल्ला व मारहाण व्हावी. ही कृती बेकायदेशिर असुन अंधश्रध्देला खतपाणी घालणारी आहे. जादुटोण्याच्या संशयावरून माझ्या कुटूंबाला वार्डातील काही मंडळीकडून धोका होण्याची शक्यता आहे. म्हणुन आम्ही आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. या उद्देशाने सतीश आकुलवार यांचेसह वार्डातील दहा ते बारा जणांविरूध्द पोलीसात तक्रार नोंदवली.

घडलेली घटना दखलपाञ असताना पोलीसांनी अदखलपाञ गुन्ह्याची नोंद करून आम्हाला परत पाठवले व घरावर चालुन येणा-या मंडळीना संरक्षण दिले जात आहे. पोलीसांची ही कृती अन्यायकारक असुन आमच्या कुटूंबासाठी धोक्याची असल्याचा आरोप राधेश्याम गुज्जनवार यांच्या पदवीधर असलेल्या मुलीने पञकार परीषदेत केला. घडलेल्या प्रकाराविषयी वरीष्ठांकडे दाद मागणार असुन न्यायासाठी उपोषणास बसण्याचाही इशारा दिला. यावेळी गुज्जनवार कुटूंबीय उपस्थित होते.

जादुटोण्याच्या संशयावरून घरावर हल्ला करणाऱ्या सतिश आकुलवार व इतरांविरूध्द कारवाई न झाल्यास १८ सप्टेंबर पासून कुटुंबासह गांधी चौकात आमरण उपोषणास बसण्याचा इशारा सुनिता राधेश्याम गुज्जनवार यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.

महाराष्ट्र अंधश्रदधा निर्मूलन समितीने सदर घटनेची दखल घेत चौकशी करून सहकार्य करण्यासाठी पोलीसांना विनंती केली. परंतु त्यांच्याही निवेदनाला पोलिसांनी केराची टोपली दाखविली.

सदर प्रकाराची वरीष्ठांकडे तक्रार होताच स्थानिक पोलीसांनी गुज्जनवार कुटूंबियांना पोलीस स्टेशन मूल येथे बोलावले. घरावर चालुन येणाऱ्या मंडळी पासुन बेकायदेशीर व धोकादायक कृती होवु नये म्हणुन सध्यास्थितीत प्रतिबंधात्मक कारवाई करीत असल्याचे आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पोलीसांच्या विनंतीनुसार गुज्जनवार कुटूंबानी सध्यास्थितीत उपोषण स्थगीत केले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये