ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘जॉय ऑफ गीव्हींग’ चा अनुभव

चांदा ब्लास्ट

नैतिक मूल्य रूजवायची असेल तर ती कृतीतून रूजवता येतात. याचीच प्रचिती देत चांदा पब्लिक स्कूल येथे ‘जॉय ऑफ गीव्हींग’ या उपक्रमा अंतर्गत डेबू सावली वृद्धाश्रमातील वृद्धांकरीता धान्य वाटप करण्यात आले. याकरीता वर्ग 8वी ते 10वी च्या कॅबीनेट विद्यार्थ्यांनी पूढाकार घेतला. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी अल्पशी मदत म्हणून आपापल्या घरून धान्य आणून शाळेत एकत्र केले यातुनच 350 किलो तांदूळ, 100 किलो गहू, 50 किलो डाळी व तेलाचा डब्बा इत्यादी संग्रहीत सामग्री वृद्धाश्रमाला भेटस्वरूप देण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या मनातील वृध्दांविषयीची ही तळमळ बघुन वृध्दाश्रम स्थित आजी-आजोबा भावुक झाले.
शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे, प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतूक करत पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.

प्रस्तुत उपक्रम यशस्वी करण्याकरीता कार्यक्रम प्रमुख श्री. फहीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली रेवती बडकेलवार, रेश्मा शेख, जास्मीन हमीम, वासवी राधाराम या शिक्षकांचे व विद्यार्थी मंत्रीमंडळातील विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये