ताज्या घडामोडी

शालीनी बोंतला व शंकर मोहुर्ले यांचा भाजपा राजुरा वि. क्षे. प्रमुख देवराव भोंगळेंनी केला सत्कार

तालुकाध्यक्ष सुनील उरकुडे व भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहेंसह कार्यकर्त्यांची उपस्थिती

चांदा ब्लास्ट शहर प्रतिनिधी

आशिष यमनुरवार, राजुरा

आज राजुरा येथे जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा राजुरा विधानसभा क्षेत्र भारतीय जनता पार्टीचे प्रमुख देवराव भोंगळे, भाजपा चे राजुरा तालुका अध्यक्ष सुनील भाऊ उरकुडे, भाजपायुमो चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन भाऊ डोहे, स्कॉट फिटनेस क्लबचे सर्व ट्रेनर, सभासद व भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शालिनी बोंतला व शंकर मोहुर्ले ह्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच स्कॉट फिटनेस क्लबचे संचालक रुपेश करडभूजे ह्यांचाही सत्कार करण्यात आला.

नुकत्याच छत्तीसगड येथे झालेल्या भारतीय जागतिक प्रतियोगितेत शालिनी बोंतलाने बेंच व डेड लिफ्ट मध्ये सुवर्ण पदक तर शंकर मोहूर्ले यांनी बेंचमध्ये कांस्यपदक पटकाविले होते. मागील ६ वर्षापासून राजुरा शहरात स्कॉट फिटनेस क्लबचे संचालक रुपेश करडभूजे हे राजुरा शहरात आपल्या फिटनेस क्लबच्या माध्यमातून युवा तरुण-तरुणी, पुरुष व महिला यांचे शरीर बळकट करण्यासाठी व व्यायामाची रुची वाढविण्यासाठी परिश्रम घेत असल्याबद्दल देवराव भोंगळे ह्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. त्याचप्रमाणे दोन्ही विजेत्यांचे भाजपच्या वतीने जिल्ह्याचे पालक मंत्री मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते गौरव करू असे आश्वासन देतानाच इतर सर्व सदस्यांना भविष्यातील यशासाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये