ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धुनकी येथे तलाव नसताना शासकीय गायरान जमीनीतून मुरूम दगडाचे उत्खनन जोरात?

धुनकी कारवा भागातील उत्खननाचे मोजमाप करूण सत्य पुढे आणावे - गावकऱ्यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

          राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ठेकेदार व महसुल विभागाने धुनकी शिवारात महसुल विभागाच्या गायरान जमिनीवर तलाव खोलीकरण व गाळ उपसा दाखवून महसुल अभिलेखात पाटबंधारे विभागाकडे तलाव म्हणून नोंद नसताना धुनकी येथिल गायरान जमिनी मधून जि.आर.आय.एल या कंत्रटदार कंपनी  ने गेल्या तिन महिण्यापासून उत्खनन करूण आसन खु ते गडचांदूर पर्यंत मुरुम दगड वापर केला. मात्र, त्या ठिकाणी तलाव व गाळ नसल्याने उत्खनन क्षेत्रात चुनखड्डी दगड लागल्यामुळे स्थानिक नागरीकांना यांचा कोनताच लाभ होणार नसल्याने कंपनीने शासनाची दिशाभुल व चुकीच्या पद्धतीने सिमाकन पंचनामे दाखवित उत्खनन करीत शासनाच्या गौण खनिज स्वामित्वधन वाचवित उत्खनन करीत असल्याचे नागरीकाची ओरड सुरु आहे.

        मात्र, त्या क्षेत्रात पायभूत सुविधा उपलब्ध करण्यात येणाऱ्या धोरणाला तिलांजली देत मुरुम पोखरून दगड उघड पाडण्याचा सपाटा राष्ट्रीय कार्यात सहभाग म्हणत पायाभूत सुविधा देण्या ऐवजी भविष्यात पाणी संचयन होणार नाही असे कार्य जोमात सुरु असून सिमांकन व प्रत्यक्ष भेट देऊन पडताळणी करणाऱ्या अधिकारी तलाव नसताना गायरान जमिनीच्या उत्खनन सिमांकन करुण देणाऱ्या अहवालावरच प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे ठेकेदार स्थानिक ग्राम पंचायत पदाधिकारी यांचेशी संपर्क करूण आपल्या सोयीचा अहवाल तयार करूण शासनाची दिशाभुल करीत असल्याने धुनकी कारवा भागातील उत्खननाचे मोजमाप करूण सत्य पुढे आणावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये