ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

२ अट्टल गुन्हेगाराकडुन एकुण १२ मोटरसायकल हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

चांदा ब्लास्ट

        चंद्रपुर जिल्हयामध्ये होत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्याकरिता मा. पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक मा. महेश कोडावार यांनी विशेष पथक तयार करून त्यांना त्याबाबत निर्देश दिले होते.

           पोलिस निरीक्षक महेश कोडावार स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपुर यांचा मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर चे पथक हे मोसा चोरीचे रेकॉर्डवरिल गुन्हेगार शोध मोहीम पेट्रोलिंग राबवीत असतांना पोस्टे शेंगाव हद्दीतील चारंगाव बु बस स्टॉप येथे जावुन सापळा रचून मो.सा रेकॉर्डवरील आरोपी नामे आरोपी नामे 1)राजु बालाजी धुर्वे वय 33 वर्ष रा. अर्जुनी कोकेवाडा ता.वरोरा जि. चंद्रपूर 2) प्रशांत उर्फ भोला कवडुजी गाते वय 31 वर्ष रा.शिवाजी नगर,नितेची वाडी ता.भद्रावती जि.चंद्रपूर यांना ताब्यात घेवुन त्याचे कडुन मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहे.

          पो.स्टे भद्रावती अप. क्रं. ४८१/२३ कलम ३७९  भांदवी, यावरील एक मोटासायकल किंमत ४०,०००/- तसेच दुसरी ६५२/२२ कलम ३७९ भांदवी मोटासायकल किँमत ५०,०००/-

              पो. स्टे. वरोरा ७३८/२३ कलम ३७९ भांदवी मोटासायकल किँमत ४०,०००/- व ७३७/२३ कलम ३७९ भांदवी मधील मोटासायकल किँमत ४०,०००/-

           पो. स्टे. चिमूर ३६/२३ कलम ३७९ भादवी मधील मोटार सायकल किँमत ५०,०००/-

           पो. स्टे. सिंदेवाही ३८०/२३ कलम ३७९ भांदवी मधील प्रत्येकी वेगवेगळ्या सात मोटार सायकलची किँमत ४०,०००/- याप्रमाणे पो.स्टे. भद्रावती, वरोरा, चिमुर, सिदेवाही येथील दाखल असलेले मोसा चोरीचे गुन्हे उघडकीस करण्यात आले.

सदरची यशस्वी कामगीरी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो. नि. महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, यांचे नेतृत्वात सपोनि जितेद्र बोबेडे, पो.उप.नि. विनोद भुरले, पो. हवा. संजय आतकुलवार,पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, नापोकॉ संतोष येलपुलवार, अजय बागेसर, दिनेश अराडे व पो.अ. नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, प्रशांत नागोसे, रूषभ बारसिगे, सिसिटिनएस चे पोहवा गोपाल पिंपळशेन्डे व सायबर पथक यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये