ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फायनल क्रिकेट सामन्यावर क्रिकेट बेटींगचा जुगार बुकिवर कारवाई

एकुण ५ लाख ६१ हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक ०९/०३/२०२०१५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन वर्धा (शहर) परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना गोपणिय माहितीचे आधारे, सिध्दार्थनगर वर्धा येथे राहणारा विशाल उर्फ डॉक्टर प्रमोदराव मुन, वय ३२ वर्ष, रा. सिध्दार्थनगर, वार्ड न. ०५, वर्धा याचे राहते घरी छापा घातला असता तो घराचे बैठक रूममध्ये दिवानवर बसुन सध्या सुरू असलेल्या आयसीसी चॅम्पीयन ट्रॉफी २०२५ या क्रिकेट सामना दुबई येथे सुरू असुन भारत विरूध्द न्युझीलंड या फायनल क्रिकेटच्या सामन्यावर त्याचेजवळ असलेल्या वेगवेगळ्या मोबाईलव्दारे वेगवेगळ्या Apps द्वारे ग्राहकांची आयडी तयार करून त्याव्दारे भारत विरूध्द न्युझीलंड क्रिकेट लाईव्ह मॅचवर ऑनलाईन किकेट जुगार खेळवताना मिळून आल्याने आरोपीचे ताब्यातून १) ३ वेगवेगळे Android मोबाईल किमंत ४५०००/- २) क्रिकेट जुगाराचे व सटटापटी जुगाराचे नगदी १५,७२०/- रूपये, ३) वेगवेगळया बँकेचे एटीएम व क्रेडीट कार्ड एकुण ०७ नग ४) एक स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा शिवाजी चौक वर्धा चे पासबुक, ५) सटटापटीचे आकडे लिहलेले ०६ कागद ६) एक जुने पिवळ्या रंगाचे रजिस्टर ७) एक जुनी वापरती सिल्व्हर रंगाची मारूती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर मॉडेल चारचाकी कार जिचा नोंदणी क्रमांक एम. एच. २७ वी होड ६५४७ असा एकुण जुमला किंमत ५,६१,२२०/- रू चा मुद्देमाल जप्त केला.

 यातील आरोपीस मोबाईलव्दारे ऑनलाईन चालणाऱ्या क्रिकेट बेटींग जुगारबाबत विचारणा केली असता त्याने त्याचा साथीदार नामे अक्षय मेंढे रा. समतानगर वर्धा हा क्रिकेट जुगाराकरीता ग्राहकांना लागणारी आयडी ऑनलाईन पध्दतीने तयार करून देत असून त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार त्याचा साथीदार नामे योगेश पंजवाणी रा. दयालनगर वर्धा याचेकडे करीत असतो. त्यावरून तिन्ही आरोपीतांविरूध्द पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास सुरू आहे.

 सदरची कारवाई मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक वर्धा, मा. डॉ. श्री. सागर कवडे, अपर पोलीस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी, पोउपनि श्री. अमोल लगड, पोलीस अंमलदार गजानन लामसे, चंद्रकांत बुरगे, भुषण निघोट, रितेश शर्मा, मनीष काबंळे, अमोल नगराळे, मंगेश आदे, दिपक साठे, प्रफुल पुनवटकर, अक्षय राउत, अनुप कावळे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये