ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गेल्या 15 वर्षांच्या आमदार पदाच्या कारकीर्दीत सुधीरभाऊंनी बल्लारपूर शहरात काय विकास केला?- रविकुमार पुप्पलवार

चांदा ब्लास्ट

नुकतेच खासदार पदाच्या शर्यतीत उतरलेले जिल्हयाचे पालकमंत्री तसेच बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विकासकामांवर आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. “फक्त करोडोंच्या इमारती, रस्ते,सौंदर्यीकरण यालाच विकास म्हणायचा का? या विकासामुळे सामान्य जनतेला काय मिळाले? विकासपुरूष म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुधीरभाऊंनी शहरातील सरकारी शाळांमधील अवस्था सुधारण्याकडे आजपर्यंत लक्ष दिले नाही? पण विद्यार्थांना देणाऱ्या बुकांमध्ये आपले फोटो छापून प्रचार केला. यालाच विकास म्हणतात का.? शहरातील ग्रामीण रुग्णालयाची इमारत बांधली गेली आहे.

परंतु या सामान्य जनतेसाठी रूग्णालयात वैद्यकीय सोय-सुविधांचा अभाव आहे. त्याकडेही सुधीरभाऊंनी कधीच लक्ष दिले नाही. बल्लारपूर शहरात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. अवाढव्य पाणी बिले जनतेला पाठवली जात आहे. चंद्रपूर व राजुरा शहराप्रमाणे वार्षिक सरासरी पाणी बिलाची सोय बल्लारपूर शहरातील नळ धारकांना करून देण्यासाठी आमदार साहेबांनी आजपर्यंत दुर्लक्ष का केला? औद्योगिक शहर म्हणून गणल्या जाणाऱ्या बल्लारपूर शहरात शिक्षित बेरोजगारांची संख्या प्रचंड आहे.

या 15 वर्षांच्या आमदार पदाच्या कारकीर्दीत त्यांनी रोजगार वाढविण्यासाठी अयशस्वी रोजगार मेळावा घेण्या शिवाय काय प्रयत्न केले? असा सवाल पुप्पलवार यांनी उपस्थित केला. पेपरमीलमुळे होणारे प्रदूषण यावर कोणतेही पाऊले उचलली नाही. पेपरमीलच्या स्टॉक यार्डमुळे शहरात प्राण्यांचा हैदोस वाढला असतांना देखील वनमंत्री म्हणून कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. शहरातील नागरिकांना अवाढव्य घर टॅक्स पाठिला जातो त्यावर भाऊंनी कोणतेही कार्य केले नाही. विकासपुरुषांचा विकास सामान्य जनतेच्या कधीही कामी आला नाही, हिच परिस्थिती असल्याचे पुप्पलवार म्हणाले.

आमदार, जिल्हयाचे पालकमंत्री, राज्यात अनेक मंत्रीपदे उपभोगल्यानंतर आता ते खासदार पदाच्या मैदानात आहेत. आता खासदार बनून सामान्य नागरिकांचा विचार करतील कि फक्त विकासाचा देखावाच्या मागे कमिशनचा कारभार करतील हे आपल्याला बघावे लागेल असे देखील रविभाऊ पुप्पलवार म्हणाले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये