ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माया केअरने सामाजिक बांधिलकी जपत वृद्धाश्रमातील आजोबांना बांधली राखी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

३० ऑगस्ट 2023 रोजी रक्षाबंधन हा सण संपूर्ण भारतभर संपन्न झाला. भाऊ आणि बहिणी च्या अतुल व पवित्र नात्याचा सण मानला जातो. सध्या काही ज्येष्ठ नागरिकांची मुले नोकरी निमित्त बाहेरगावी परराज्यात किंवा परदेशात असल्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना हा सण साजरा करता येत नाही.

यामध्ये बरेच लोक वृद्धश्रमामध्ये असतात. या ज्येष्ठ नागरिकांना काही कारणास्तव आपल्या बहिणीच्या हातून राखी बांधू शकत नाहीत. परंतु याच गोष्टीची दखल घेत माया केअर फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी ज्येष्ठांनी हा सण उत्साहात साजरा करावा यासाठी पुढाकार घेतला. व विविध वृद्धाश्रमांना भेटी देऊन त्यांना राखी बांधून व त्यांचे औक्षण करून हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे चेहऱ्यावर सुखद आनंद निर्माण झाला. त्यांनी माझ्या स्वयंसेवकांना भरभरून आशीर्वाद दिला. या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

यामध्ये 1) कोल्हापूर येथे माय सावली केअर सेंटर येथे सौ विमल पोखरणीकर 2) मातोश्री वृद्धाश्रम आर के नगर कोल्हापूर येथे संगीता राठोड 3) महेश्वरी वानप्रस्थ वृध्दाश्रम नागपूर येथे सुषमा कामडी व रामदास कामडी. 4) अथष्री वृध्दाश्रम नागपूर येथे भाग्यश्री गुप्ता व गीता हजारे 5) फैजन ए सुन्नी मस्जिद वृध्दाश्रम उमरेड नागपूर येथे अश्विनी रणदिवे. 6)बेघर निवारा केंद्र धुळे येथे मनीषा पाटील. 7) मातोश्री वृध्दाश्रम धुळे येथे अनिता कसब, सावली वृध्दाश्रम धुळे येथे मनीषा पाटील, योगिता पवार 8) कृपाळू वृध्दाश्रम संभाजीनगर येथे प्रिय सरदार व नितीन गायकवाड 9) श्री गुरुदेव वृध्दाश्रम मोझरी अमरावती येथे कांचन व प्रवीण आखरे 10) स्नेहबंध केअर वृध्दाश्रम सांगली येथे उज्ज्वला पाटील. 11) मातोश्री वृद्धाश्रम येथे हरिदास तुरुक व त्यांची मुलगी. 12) श्री छत्रपती शिवाजी महाराज वृध्दाश्रम येथे मोनिका व समाधान वानखडे. या सर्व स्वयंसेवकांनी माया केअर फाऊंडेशन क्या वतीने रक्षाबंधनाच्या पवित्र कार्यक्रमात भाग घेऊन यशस्वीरीत्या कार्यक्रम संपन्न केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये