ताज्या घडामोडी

काँग्रेस जनसंवाद पदयात्रेला कोरपना तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट :

प्रमोद गिरटकर

कोरपना (ता. प्र) :– अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते जननायक खा. राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार, चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्नाखाली कोरपना काँग्रेसच्या वतीने तुकडोजीनगर येथील संत जगन्नाथ बाबा मंदिर येथून सकाळी 8 वाजता जनसंवाद पदयात्रेला सुरूवात करण्यात आली. संत जगन्नाथ बाबा चे दर्शन घेऊन पदयात्रा सुरू झाली. यादरम्यान तांबाडी गांधीनगर, कोडशी (बू) कोडशी (खु) हेटी, शेरज, माथा असा 20 किलोमीटर प्रवास करीत ठिक ठिकाणी केंद्रातील मोदी , राज्यातील शिंदे सरकार पुरस्कृत महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, अन्यय – अत्याचार याबद्दल जनजागृती करणारे परिपत्रके वाटून, जनजागृतीपर नारे, भजन – किर्तन करून, कार्नर सभा घेऊन नागरिकाशी थेट संवाद साधण्यात आला. सकाळी तुकडोजी नगर येथून सुरू झालेली पदयात्रा दुपारी कोडशी येथे पोहचली. येथे काँग्रेस चे जेष्ठ नेते सुरेश पाटील मालेकर यांच्या घरी भोजन उरकून लगेच पुढील प्रवासाला सुरुवात झाली. शेवटच्या टप्प्यात माथा येथे पोहचून पदयात्रेचा पहिला दिवस पुर्ण होईल. संध्याकाळी माथा येथे कॉर्नर सभा पार पडली .

या प्रसंगी श्री विजरावजी बावणे संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तथा जिल्हा महासचिव काँग्रेस कमेटी तालुकाध्यक्ष उत्तमरावजी पेचे जेष्ठ नेते सुरेश पाटील मालेकर कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती अशोकरावं बावणे पुंडलिक गिरसावले युवक काँग्रेस चे तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे खैरगाव सरपंच रोशन मरापे राजरा काँग्रेस महासचिव रोशन आस्वले दिलीप मालेकर OBC तालुकाध्यक्ष राहुल मालेकर संजय गांधी निराधार समीचे माजी अध्यक्ष उमेश राजुरकर रमेश बोरडे मनोहर विधाते बंडू पिदूरकर रवींद्र नांदेकर ताराचंद मुक्के दत्ता मसे दत्ता उपरे प्रेम बोंडे अनिल गोंडे रसूल पटेल जम्मू भाई रमजान भाई वामन मुसळे झिबल गेडाम श्रीकांत लोडे यासह कोरपना तालुका महिला कॉंग्रेस चे अध्यक्षा आशाताई खासारे जिल्हा परिषद चे माजी सदस्य विनाताई मालेकर कोरपना न.प.चे नगरसेविका आरिफा ताई शेख जोशना खोबरकर माजी नगरसेविका संगीता पंधरे समशाद परवीन सुवर्णा झाडे संगीता लिंगोट वैशाली लोंढे माया सातपुते सुषमा दोरखंडे ज्योती नाहर या सह कोरपना शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, एन.एस.यु.आय यासह काँग्रेसच्या विविध आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये