चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

आले रे बाप्पा गाण्याने केले रसिकांच्या मनावर अधिराज्य

स्थानिक कलावंतांना डिजिटल प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचा उद्देशाने

 

चांदा ब्लास्ट

स्थानिक कलावंतांना डिजिटल प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचा उद्देशाने ध्येयवेड्या शिक्षक तथा निर्माता, दिग्दर्शक मुरलीधर सरकार यांनी नुकताच “आले रे बाप्पा” या गीताला संगीतबद्ध आणि चित्रीकरण करून बाप्पाच्या भक्तांच्या भेटीला आणला आहे। लोकार्पण सोहळा होताच अल्पावधीतच बाप्पाच्या सुरेल गाण्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य केले.

कोरोनामुळे अनेक कलावंतांच्या हाताला काम नव्हते ही वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन कलावंतांच्या हाताला काम देण्यासह त्यांच्या सुप्त कलागुणांना डिजिटल मंच मिळवून देणे आणि सोबतच देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत पोहचवण्याचा संकल्प युवा निर्माता, दिग्दर्शक मुरलीधर सरकार यांनी केला आहे। कोरोनाकाळात उत्सवाला बंदी होती त्यातच भक्तांचे मन कोमेजलेले होते अश्यातच सर्व भक्तांच्या मनात हर्ष, उल्हास निर्माण करण्यासाठी चाळीस स्थानिक कलाकारांना सोबत घेऊन आले रे बाप्पा या गीताचे चित्रीकरण केले।सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर सदर गाना प्रदर्शित होताच बाप्पाच्या सुरेल गाण्याने रसिकांना भुरळ घालत आहे.

कधी रुपेरी पडद्यावर झळकण्याची इच्छा असणाऱ्या कलावंतांना त्यांचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे आणि त्यांच्या घरी आनंदाचे वातावरण पसरले आहे।जिद्द, चिकाटीच्या भरवशावर संगीत क्षेत्रात मुरलीधर सरकार यांनी आपली वेगळी छाप सोडली आहे। विशेष म्हणजे या गीतातील सर्व कलावंत, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, गायक सर्व स्थानिक आहेत त्यामुळे मुरलीधर सरकार यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे।आले रे बाप्पा गीत सद्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. हजारोंच्या संख्येने सोशल मीडियावर युजर्स असुन त्यांच्या सर्व गीताला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे।सर्व बाप्पाच्या भक्तांनी आणि संगीत प्रेमींनी डिजिटल मीडियावर बघावं आणि मनसोक्त आनंद घ्यावा असा हा व्हिडीओ आहे।ज्योती रामावार,वसुधा गावतुरे, अश्विनी खोब्रागडे, विजय पारखी, आशीष गायगोले, स्नेहीत पडगेलवार,संदीप मंडल, तुषार कोटगीरवार,कुलदीप रविदास, संजना डांगरे,प्रदीप पारखी, हरिदास पाऊनकार, महेश आत्राम, त्रिशा उराडे, गुंजन बोरीकर, अंतरा उराडे, प्रगती सोनुले, चंदा राऊत आदी कलाकारांचे सहकार्य मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button