ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटना यांची शिक्षण संचालक(प्रा.) यांचेशी बैठक संपन्न

शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडवा ; निरक्षर सर्व्हेक्षणावर शिक्षकांचा बहिष्कार कायम

चांदा ब्लास्ट

 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेची महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक(प्रा) शरद गोसावी यांचे समवेत शिक्षण संचालक कार्यालय पुणे येथे १ सप्टेंबर २०२३ रोजी दु.१२वा. बैठक संपन्न झाली.शिक्षण संचालक यांनी प्रतिनिधी मंडळास वेळ देत सर्व प्रश्न समजावून घेऊन पुर्ततेचे सकारात्मक आश्वासन दिले.

शालेय पोषण आहार योजनेबाबतच्या अडचणी प्रतिनिधी मंडळाने मांडल्या यावर चर्चा करून कमीत कमी रेकॉर्ड शा.पो.आ.चे.ठेवण्याबाबत निर्णय घेवू, यानंतर आँडीट फक्त तीन वर्षातून एकदा करणेबाबत तसेच लोकल आँडीट बंद करण्याविषयी शिफारस शिक्षण संचालय शासनाकडे करणार असल्याचे सांगितले. शिक्षकांच्या वेतनातील विलंब दूर करुन दर महिन्याच्या १ तारखेला शासन निर्णयाप्रमाणे वेतन शिक्षकांना मिळावे याविषयी प्रतिनिधी मंडळाने आग्रही मागणी केली यावर लवकरच सीएमपी प्रणाली मार्फत शिक्षकांचे वेतन करण्याबाबत तयारी झाली असून प्रायोगिक तत्वावर जालना व चंद्रपूर जिल्ह्याची निवड केली आहे त्यानंतर संचालक कार्यालय ते थेट शिक्षकांच्या खाती सीएमपी प्रणालीद्वारे वेतन जमा होणार आहे त्यामुळे नजीकच्या काळात वेतनाचा विलंब कमी होईल असे चर्चेत सांगितले. सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते ,सेवानिवृत्त कर्मचारी यांचे अंशदान/उपदान, वैद्यकीय प्रतिपूर्ती तसेच आँफलाइन देयकांसाठी निधी मिळावा अशी मागणी केली असता राज्य शासनाकडून अधिवेशनात निधीला मंजूरी मिळाली असून सातव्या वेतन आयोगाचे हप्त्यासाठी संचालक कार्यालयाकडे निधी येताच सर्व जिल्ह्यंना वितरीत केला जाईल तसेच वैद्यकीय प्रतिपूर्ती व सेवानिवृत्त शिक्षकांचे २ वर्षापासून रखडलेल्या अंशदान व उपदान व इतर आँफलाइन बिले प्राधान्य क्रमाने काढण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यांना देण्यात येतील असे मा. संचालक यांनी सांगितले.
विविध माहिती व अँप बाबत- शिक्षकांकडून कमीत कमी माहिती संकलन करण्याबाबत व शिक्षण विभागात सुसूत्रता निर्माण करुन सर्व जिल्हा शिक्षण विभागांना सूचना देण्यात येणार असून शासनाच्या उपक्रमाशिवाय कोणतेही स्थानिक उपक्रम, अँप (उदा.विनोबा अँप,व्हिस्कूल,इ.) चा वापर करण्यात येवू नये किंवा त्यांच्या नोंदी ठेवण्याची सक्ती करु नये तसेच अनावश्यक माहिती संकलन करण्यात येवू नये अशा सूचना सर्व जिल्हा परिषदांना देण्यात येणार आहेत.
पदवीधर पदोन्नती बाबत केंद्रशासनाचे एनसीटीए नोटीफिकेशन नुसार टिईटी परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांना पदोन्नती द्यावी असा उल्लेख आहे. परंतू २०१३ पुर्वीच्या शिक्षकांना ही अट नसावी असे संचालक यांनी मान्य केले असून त्यानुसार प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला सादर करावा असे सभेत ठरले व याबाबत संघटना प्रतिनिधी शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांची लवकरच भेट घेवून पदवीधर पदोन्नती चा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे. सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी देण्याबाबत- सर्व विषय शिक्षक हे पदवीधर म्हणून काम करत आहेत परंतु त्यांना वेतनश्रेणी मिळत नाही “समान काम समान वेतन” या न्याय तत्वानुसार सर्वाना वेतनश्रेणी मिळावी अशी मागणी केली त्यावर शिक्षण संचालनालयाने महाराष्ट्र शासनाकडे तात्काळ प्रस्ताव पाठवत असल्याचे शिक्षण संचालक यांनी सभेत सांगितले. याबाबत राज्य स्तरावर पुढील पाठपुरावा करण्यात येणार आहे. केंद्र प्रमुख पदोन्नती साठी सेवाज्येष्ठता हाच निकष असणार तसेच वयाची ५० वर्षीची व पदवी साठी किमान ५० गुणांची अट रद्द करण्याविषयी शिफारस शासनाकडे करावी अशी आग्रही मागणी प्रतिनिधी मंडळाने केली आहे. विज्ञान विषय (बीएससी अट )शिक्षकांच्या पदावनतीबाबत- याबाबत मा.उच्चन्यायालयाकडून स्थगिती आलेली आहे त्यामुळे बीएससी पुर्ण नाही म्हणून कोणत्याही विज्ञान विषय शिक्षकांना पदावनत करता येणार नाही असे शिक्षण संचालक यांनी स्पष्ट केलेआहे. बीएससी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना मुदतवाढ मिळावी ही मागणी करण्यात आली आहे. पदोन्नतीसाठी सर्व जागा खुल्या करणेबाबत- बदली व समायोजन आदी बाबीसाठी समानीकरणाची किंवा अनिवार्य रिक्त पदे अशी अट असू शकते परंतु पदोन्नती अशी अट काही जिल्ह्यात लावली जात आहे त्याबाबत पदोन्नती साठी अशी कोणतीही अट लावता येणार नाही असे संचालक यांनी स्पष्ट केले.शिक्षक संचमान्यतेमध्ये १ली ७/८वी पर्यत वर्ग असणाऱ्या शाळांना १०० पटापर्यत मुख्याध्यापक पद मंजूर करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तसेच आधार बेस संचमान्यतेसाठी येणाऱ्या अडचणी बाबत चर्चा करण्यात आली आहे. संचमान्यता ३१ जुलैच्या पटावर करावी अशी मागणी केली असता काही तांत्रिक बाबीमुळे ते शक्य होत नाही परंतु यापुढे ३० सप्टेंबर ला संचमान्यता फाइनल करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.
शाळास्तरावरील परीक्षाबाबत-जून ते आँगस्ट अडीच महिन्यात सेतू पुर्व व उत्तर चाचणी, पायाभूत चाचणी, अकारीक मुल्यमापन तसेच विविध एनजीओच्या माध्यमातून होणा-या परीक्षा यामुळे शिक्षक व विद्यार्थी त्रस्त झाले आहेत .याबाबत पुढील काळात राज्य स्तरावरून परीक्षांबाबत धोरण ठरवून परीक्षांची संख्या मर्यादित केली जाईल.
पाठ्यपुस्तक व गणवेश वितरणात येणाऱ्या अडचणी बाबत -पाठ्यपुस्तके व गणवेश लाभार्थी संख्या मागील युडायस प्रमाणे निश्चित होते व प्रत्यक्ष पट जास्त असतो त्यामुळे काही विद्यार्थी वंचित राहतात.यापुढे सरल डाटा व युडायस यांचा मेळ घालून पाठ्यपुस्तके व गणवेश लाभार्थी निश्चित करण्याची सुचना करण्याचे सांगितले.
नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता ४४० रुपये टॅब उपलब्ध नसल्या कारणाने एप्रिल पासून दिला जात नाही असे प्रतिनिधी मंडळाने सांगितले सदर टॅब पुन्हा उपलब्ध करुन भत्ता सुरू करण्यात येणार आहे. गटशिक्षणाधिकारी , उपशिक्षणाधिकारी, आणि शिक्षणाधिकारी ही ५० टक्के पदे कार्यरत शिक्षकांन मधून भरली जावीत यासाठी मुळ शासन निर्णयात बदल करण्यासाठी अहवाल सादर करावा.अशी मागणी संघटनेने केली
वस्तीशाळा शिक्षकांची मूळसेवा वरिष्ठ वेतनश्रेणी ग्राह्य धरण्यासाठी शासनाकडे अहवाल सादर करावा. या सर्व झालेली चर्चा विषया संबधीत झालेले निर्णय यांचे प्रोसडींग तयार करुन एक प्रत शासनास व एक प्रत मध्यवर्ती संघटनेस देण्याची सूचना संचालक यांनी केली
शिक्षण आयुक्त यांची भेट
यानंतर स़ंघटना प्रतिनिधी यांनी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची भेट घेतली व निवेदन दिले. शिक्षक प्रश्नी लवकरच मध्यवर्ती संघटनेला वेळ देण्याची सूचना त्यांनी कार्यालयीन अधिक्षक यांना केली.त्यानुसार लवकरच शिक्षण आयुक्त यांचे समवेत मध्यवर्ती संघटनेची बैठक होणार आहे.
शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्याचे आवाहन. ५सप्टेंबर हा शिक्षक दिन शिक्षकांच्या आत्मसन्मानाचा दिवस असून त्या दिवशी कोणतेही निदर्शने , आंदोलन न करण्याचा निर्णय राज्य मध्यवर्ती संघटनेने घेतला आहे. त्यामुळे शिक्षक दिन उत्साहात साजरा करावा असे आवाहन करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती
महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटनेचे अध्यक्ष केशव जाधव ,सरचिटणीस राजेश सुर्वे ,संघटक प्रसाद पाटील, चिंतामण वेखंडे, कोषाध्यक्ष साजीद निसार अहमद,कल्याण लवांडे, गौतम टाकळीकर ,उपाध्यक्ष अनिल पलांडे,यादव पवार, युवराज पोवाडे, जेष्ठ नेते -शिवाजीराव साखरे ,मनोज मराठे,उत्तरेश्वर मोहळकर, नंदकुमार पानसरे, संतोष पिट्टलवाड, पुरुषोत्तम जाधव, आदी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.अशी माहिती राज्य नेते विजय भोगेकर प्रसाद पाटील राज्याध्यक्ष ,हरीश ससनकर राज्य सरचिटणीस, जी.एस.मंगनाळे राज्य उपाध्यक्ष, किशोर आनंदवार जिल्हाध्यक्ष,सुरेश गिलोरकर जिल्हा सरचिटणीस, गंगाधर बोढे जिल्हा कार्याध्यक्ष,सुनिल कोहपरे जिल्हा कोषाध्यक्ष महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना यांनी दिली आहे.असे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख लक्ष्मण खोब्रागडे यांनी एका पत्रान्वये कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये