ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रम शिस्त आणि सातत्य हाच यशाचा खरा मार्ग – डॉ.नरेशचंद्र काठोडे

सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर- विद्यार्थ्यांनी जीवनात कठोर परिश्रम घेत शिस्त आणि सातत्य ठेवले तर यश नक्कीच मिळते .ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थी सुद्धा स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकतात स्पर्धा परीक्षेत यश मिळवणाऱ्या मध्ये ग्रामीण भागातील व मराठी शाळेतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे.त्यामुळे मनात कुठलाही न्यूनगंड न ठेवता विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन अभ्यास केला तर यशाची शिखरे आपण सहज गाठू शकाल.असे प्रतिपादन” मी आय ए एस अधिकारी होणारच” या विषयावर मार्गदर्शन करताना डॉक्टर नरेशचंद्र काठोडे सर (संचालक मिशन आयएएस अकॅडमी अमरावती) यांनी केले.

सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे यूपीएससी व एमपीएससी ह्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन डॉ.काठोडे सर यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थाध्यक्ष डॉ.आनंदराव अडबाले होते.त्यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावीपासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी करावी , चालू घडामोडी चे ज्ञान अद्ययावत ठेवावे. त्याकरिता नियमित वृत्तपत्राचे वाचन करावे असे विचार मांडले .कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संस्था सचिव प्रा. नामदेवरावजी बोबडे,डॉक्टर देशमुख साहेब, कार्यक्रमाचे संयोजक प्रा.संजय ठावरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डी आर काळे यांनी केले.

सूत्रसंचालन प्रा.सोज्वल ताकसांडे यांनी तर आभार प्रा. नितीन सूरपाम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.प्रशांत खैरे,प्रा विजय मुप्पीडवार, प्रा अशोक सातारकर,प्रा जहीर सय्यद,प्रा प्रवीण डफाडे,प्रा. अनिल मेहरकुरे,प्रा सुभाष भगत,प्रा किशोर गोरे,प्रा जस्मिन बेग, प्रा कविता गहूकर, सिताराम पिंपळशेंडे,शशिकांत चन्ने आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये