ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कर्जबाजारीमुळे आयुध निर्माणी कर्मचार्‍याची गळफास घेउन आत्महत्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

आयुध निर्माणी येथे दरबान पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी राहत्या घरी छताला गडफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

प्रतीक सुदर्शन चहांदे वय 34 वर्ष राहणार कटारिया लेआउट सुमठाणा असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. हा आयुध निर्माणी येथे दरबान पदावर कार्यरत होता त्याच्यावर बँकेचे गृह कर्ज होते . त्यात तो दारूच्या आहारी गेल्याने आज शुक्रवारला पहाटे घरातील सिलिंग फॅनला दोर बांधून गळफास घेतला. या घटनेची माहिती घरील व्यक्तींना होताच त्यांनी भद्रावती पोलिसांना पाचारण केले घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये