ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मूकबधिर अपंगांनी थाटले राखींचे दुकान 

पवित्र रक्षाबंधन सणाचे निमित्ताने टाकले एक पाऊल पुढे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

स्वामी शिक्षण प्रसारक संस्था द्वारा संचालित संत ज्ञानेश्वर निवासी अपंग व मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राखी चे विक्री केंद्र उभारून मला बोलता येत नाही म्हणून काय झालं, मला चालता येत नाही म्हणून काय झालं, आम्ही सुद्धा इतर व्यक्ती प्रमाणे व्यवसाय करून आमचा उदरनिर्वाह भागू शकतो हे दाखवून दिले.

विद्यालयात शालेय शिक्षणासोबत व्यवसाय शिक्षण, वाचा दुरुस्ती व असलेले व्यंग कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास या संकल्पनेने प्रेरित होऊन संस्थेचे सचिव सुनिल आरमाळ तसेच संस्थेचे उपाध्यक्ष अनिल आरमाळ, मुख्याध्यापक झनक यांच्या मार्गदर्शनानुसार या राखी केंद्राची संकल्पना अमलात आणली गेली. यासाठी वायाळ मॅडम, शेरे,आरमाळ, गायकवाड, कांबळे, लंबे, मोहिते, शिवाजी मांटे अशोक रेशवाल, तुपकर आदींनी परीश्रम घेतले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये