Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना तालुक्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

मिशन आय ए एस चे डॉ.नरेशचंद्र काठोडे हे करनार मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना – कोरपना तालुक्यातील ग्रामीण विध्यार्थिंचे पोलिस, वनरक्षक, सीआरपीएफ, सैन्यदल व इतर ही परीक्षा सोबत एमपीएसी परीक्षेतील ( नायब तहसीलदार, पोलिस निरीक्षक, सेल टैक्स इंस्पेक्टर, सहायक, मंत्रालय लिपिक ) यशानंतर, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक, या परीक्षचे ज्ञान विद्यार्थीना प्राप्त झाले पाहिजे.

याकरीता मिशन आयएएस अकॅडमी अमरावती द्वारा मी आयएएस अधिकारी होणारच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर कोरपना तालुक्यात कोरपना, गडचांदूर, नांदा ,धानोली येथे दिनांक ३१ऑगस्ट ते २ सप्टेंबर या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर नरेंद्रचंद्र कोठोडे हे मार्गदर्शन करणार आहे. गुरुवार दिनांक ३१ आगस्ट ला प्रभू रामचंद्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदा, दुपारी १२ वाजता मिशन सेवा अभ्यासिका, बाजारवाडी कोरपना, दिनाक १ सप्टेंबर ला सकाळी आठ ते दहा सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर, अकरा ते साडेबारा लालबहादूर शास्त्री विद्यालय गडचांदुर, दुपारी एक ते तीन स्कॉलर्स सर्च अकडेमी, वणी रोड कोरपना, दुपारी साडेतीन ते पाच स्वर्गीय संगीताताई चटप उच्च माध्यमिक आश्रम शाळा, आदिलाबाद रोड कोरपना दिनांक २ ला सकाळी साडेसात ते नऊ शारदा कनिष्ठ महाविद्यालय धानोली,सकाळी दहा ते बारा स्व. भाऊराव पाटील चटप आश्रम शाळा व शरदचंद्र पवार कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर,दुपारी एक ते तीन महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदुर येथे आयोजित करण्यात आले आहे.

या मार्गदर्शन शिबिराचा जास्तीत जास्त होतकरू विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन मार्गदर्शन शिबिराचे मुख्य संयोजक सेवानीवृत प्राचार्य संजय ठावरी व संबधित महाविद्यालय प्राचार्य यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये