ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतातील जिवंत विद्युत तारांच्या धक्क्याने इसमाचा मृत्यू

पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

शहरातील कालरी वार्डातील रहिवासी नाजीर अली शौकत अली सय्यद वय 40 याचा 27 ऑगस्ट 2023 ला दुपारच्या सुमारास शेतातील जिवंत विद्युत तारेचा धक्का लागून मृत्यू झाला.

वरोरा-वणी मार्गावर असलेल्या रमेश तानबाजी घाटे यांच्या शेतमागील असलेल्या शेतात रोजंदारीवर काम करीत होता.सदर शेत अश्फाक आरिफ शेख यांनी ठेक्याने घेतले होते.दुपारचे काम आटोपून आपल्या राहत्या घरी कालरी वॉर्ड येथे जात असतांना रानटी जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी लावण्यात आलेल्या जिवंत विद्युत तारांचा धक्का बसला त्यामध्ये मृतक गतप्राण झाला.

पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.मृतकाचे शव शवविच्छेदन साठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.घटनेचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये