गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दहेगाव गोसावी गावातील आठ ठिकाणी चोरी

चार लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक रोजी दहेगाव गोसावी या गावात आठ घरी चोरी करण्यात आली आहे यामध्ये बाबाराव लक्ष्मणराव घुडे वय ६७ वर्ष राहणार दहेगाव गोसावी यांच्या घरी चोरी झालेली असून यांच्या एकुण मुद्देमाल ४ लाख एकेवीस हजार रुपयांचा चोरीला गेलेला आहे.

यामध्ये दोन सोन्याचे गोफ सोन्याच्या चार अंगठ्या सोन्याच्या दोन पोती पाच तोळे कानातील दोन बि-या एक नाक्यातील नथनी दोन चांदीच्या तोरडया दोन नग चांदीचे जोडवे आणि नगदी दोन हजार रुपये तसेच रत्नाकर भोयर वय ३८ वर्ष राहणार दहेगाव गोसावी यांच्या घरुन कानातील सोन्याच्या बि-या नगदी दोन हजार रुपये हे चोरीला गेले आहे.

रामकिशन सिंघम घुपे यांच्या पानटपरी वरील एक स्पिकर आणि नगदी चार हजार पाचशे रुपये नगदी चोरीला गेले आहे आणि यांचा घरीच चोरीचा अपयश आले आहे निलेश मिटकर निलेश राऊत निलेश मसराम माया वासुदेव बुलकुंडे अंबादास नगराळे यांच्याघर बाकी घरी चोरीला अपयश आले आहे.मुद्देमाल यावेळी घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रस्थान केलेले आहे तसेच फिंगर प्रिंटची टीम पण घटनास्थळी दाखल झाले आहेत श्वान पथक पण घटनास्थळी दाखल झाले आहेत उपविभागीय पोलिस अधिकारी श्री मकेश्वर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

आरोपी वर कलम ४५४,४५७,३८० हे दाखल करण्यात आले आहे पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच दहेगाव गोसावी पोलिस स्टेशनचे ठाणेदार योगेश कामाले पोलिस उपनिरीक्षक निंबाळकर हेड कॉन्स्टेबल वंजारी हे तपास करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये