Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा 2023 संपन्न.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 23.08.2023 ते 25.08.2023 पावेतो चाललेल्या वर्धा जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धेचा समारोप समारंभ पोलीस मुख्यालयातील प्रांगणात दिनांक 25.08.2023 रोजी 16.00 वा. पार पडला.

क्रिडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास प्रमूख अतिथी म्हणून ब्रिगेडियर कौशलेश पंघाल, समादेशक केंद्रीय दारू गोळा भांडार, पुलगाव तसेच समारोप कार्यक्रमाला प्रमूख अतिथी म्हणून मा. जिल्हाधिकारी वर्धा श्री. राहूल कर्डीले साहेब व मा. कार्यकारी अधिकारी, जिल्हा परीशद वर्धा श्री. रोहन घूगे साहेब हजर होते तर अध्यक्ष स्थान मा. पोलीस अधिक्षक वर्धा श्री. नूरूल हसन यांनी भूशवीले. सर्व मान्यवरांच्या उपस्थीतीत पोलीस विभागाकडून मानवंदना देवून कार्यक्रमांची रीतसर सुरवात करण्यात आली. राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री. दिलीप बाणमारे यांचे मार्गदर्षनात पोलीस मुख्यालयासह जिल्हयातील चारही उपविभागातील 150 खेळाडूंनी विलोभनीय पथसंचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली.

जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धेदरम्यान फूटबाॅल, हाॅकी, बास्केटबाॅल, व्हाॅलीबाॅल, हॅन्डबाॅल, कबड्डी, खो-खो हे सांघीक खेळ तसेच 100, 200, 400, 800, 1500, 5000, 10000, गोळाफेक, भालाफेक, थालीफेक, लांबउडी, तिहेरी उडी या वैयक्तीक खेळांचे आयोजन करण्यात आले.

मा. पोलीस अधिक्षक व प्रमूख पाहूण्यांनी विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण केले. सर्वोत्कृश्ट पुरूश खेळाडू म्हणून संदीप जाधव व सर्वोत्कृश्ट महिला खेळाडू म्हणून सुनैना डोंगरे, दोघेही पोलीस मुख्यालय, वर्धा यांची निवड करण्यात आली. तसेच जनरल चॅम्पीयनषीप पोलीस मुख्यालय, वर्धा यांनी पटकावले.
सांगता समारोपादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय व वर्धा पोलीस दल येथील वरीश्ठ अधिकारी दरम्यान रस्साखेच स्पर्धा ठेवण्यात आली त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी यांचा विजय झाला. सांगता समारोपात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे सोबत त्यांचे परीवार सुध्दा सहभागी झाले. पोलीस परीवारातील महिला यांची संगीत खुर्ची स्पर्धा व लहान मुलामुलींची 50 मीटर धावण्याची स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले.

बिरसा मुंडा जयंती निमित्त अमृत महोत्सव दरम्यान राज्यस्तरीय गोंडी नृत्य स्पर्धेत चैथा क्रमांक पटकावणा-या ‘‘रॉयल गोंडवाना गोंडी नृत्य पथक’’ जामणी (गोजी) यांनी कार्यक्रमादरम्यान उत्कृश्ट अषा नृत्याचे सादरीकरण केले. त्यामध्ये श्री. कवडू उईके, श्री. गुलाब मसराम, श्री. सौरभ उईके यांचे विषेश योगदान लाभले. समारोपीय कार्यक्रमाअंती सुगम संगीताचे आयोजन करण्यात आले होते.

मा. पोलीस अधिक्षक यांनी आपले समारोपीय भाशणात ज्यांनी या स्पर्धांमध्ये विजय मिळवीला त्यांचे अभिनंदन करून ज्यांना विजयश्री खेचून आणता आली नाही त्यांनी खचून न जाता जिद्यीने व नव्या उमेदनीने प्रयत्न करून आपले कौषल्यपणाला लावून सांघीक भावनेने विजयश्री खेचून आणण्याचा प्रयत्न करावा. तसेच पुढे होवून घातलेल्या नागपूर परीक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धांमध्ये वर्धा जिल्हयातील सर्व खेळाडूंनी यषाचे षिखर गाठावे अषा षूभेच्छा दिल्या. मा. अपर पोलीस अधिक्षक डाॅ. श्री. सागर कवडे साहेब यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्षनात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या कार्यक्रमाचे यषस्वीतेकरीता योगदान दिलेल्या सर्वांचे आभार मानले व अभिनंदन केले.

कार्यक्रमांचे यषस्वीतेकरीता, पोलीस उपअधिक्षक (गृह) श्री. मनोज वाडीवे राखीव पोलीस निरीक्षक श्री. कमलाकर घोटेकर, राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री. दिलीप बाणमारे, सपोनि. श्री लक्ष्मण लोकरे, पोलीस कल्याण शाखा, वर्धा, खेळ प्रषिक्षक राजेष उमरे तसेच पोलीस मुख्यालय वर्धा येथील संपूर्ण अधिकारी व कर्मचारी यांनी विषेश परीश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये