Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मनपातर्फे डेंग्यु प्रतिबंधक मोहीम मिशन मोडवर!

गप्पी मासे प्रत्येक पाणी साठ्यात ; फवारणी व धुरळणी मोहीम सुरु

चांदा ब्लास्ट

डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांचा प्रसार या पावसाळ्यात होऊ नये या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असुन किटकनाशक फवारणी व धुरळणी मोहीम शहराच्या प्रत्येक भागात राबविण्यात येत आहे.

    आरोग्य विभागामार्फत डासअळी उगमस्थाने शोधुन नष्ट करण्यास कंटेनर सर्वे राबविला जात असुन संभाव्य दुषित घरे ओळखुन त्यांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. पाण्यातील डासांची अंडी खाऊन टाकणारे गप्पी मासे विविध पाण्यांच्या साठ्यात सोडण्याची धडक मोहीम सुद्धा शहरात राबविली जात असुन   नागरिकांना आपल्या घरी गप्पी मासे ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

    २५ ब्रिडींग चेकर्स, १५ एएनएम,आशा वर्कर, स्वच्छता निरीक्षक हे घरोघरी भेट देऊन कुलर, फ्रिज, फिश पॉट, पाण्याची टाकी इत्यादी डासोत्पत्ती स्थाने अबेट द्रावणाद्वारे नष्ट करत असुन प्रत्येक घरी डेंग्युविषयी जनजागृती केली जात आहे. प्रथम कंटेनर सर्वे अंतर्गत झालेल्या घरांच्या तपासणीत १४ टक्के घरे दुषित आढळल्याने दुसऱ्या टप्प्यात ज्या घरांमध्ये डासअळी उगमस्थाने आढळतील त्यांना दंडीत केले जात आहे.

    सर्व शाळांना स्टुडन्ट ॲक्टिव्हिटी कार्ड देण्यात आले असुन शिक्षक, पालक व विद्यार्थी यांना डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांचे उगमस्थान व रोगापासुन आपला बचाव कसा करावा याची माहीती देण्यात येत आहे. आता शाळकरी मुले आपल्या घरी डेंग्युविषयी जागृती करत आहेत व मनपाच्या मोहीमेस सहकार्य करत आहे. डेंग्युचा डास हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात आढळतो त्यामुळे आपल्या घराची तपासणी करणे आवश्यक असुन कूलर,टायर, भंगारातील वस्तु,डबे यात पाणी साचणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. पाणी साठवण्याची भांडी कोरडी करणे,डासअळी आढळल्यास अबेट द्रावण टाकणे, पाणी साठा मोठा असले तर त्यात गप्पी मासे टाकणे हे डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यास आवश्यक आहे.

    डेंगू हा जीवघेणा आजार आहे असल्याचे लक्षात ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे डांस वाढीला प्रतिबंध हाच सर्वात उत्तम उपाय आहे.डेंग्यु रोगासंदर्भात आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये