Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

नगर परिषद हद्दीतील वाढीव कर बंद करा – डॉ.अभ्युदय मेघे

चांदा ब्लास्ट : अविनाश नागदेवे प्रतिनिधी वर्धा….

गेल्या दोन वर्षापासून नगर परिषदेची निवडणूक न झाल्याने नगर परिषदेवर प्रशासक लागले आहे.नगर परिषद हद्दीतील अनेक लोकांचे मालमत्ता आहे.सध्या नगर परिषदेच्या वतीने चतुर्थ फेर मूल्यांकन नोटीस सर्वसामन्यांपर्यंत माणसापर्यंत पोहोचयाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आत्ताच्या पद्धतीने करापट्टी कर आकारले जातो आहे त्यापेक्षा दुप्पट करपट्टी करायचे पत्र नागरिकांना प्राप्त झाल्याने हा सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय आहे ते कर मोजणी लवकरात लवकर थांबावे यासाठी डॉ.अभ्युदय मेघे यांच्या नेतृत्वात वर्धा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी भगत यांना निवेदन देण्यात आले आहे.यावेळी मेघे यांनी मुख्याधिकारी यांना सर्वसामान्य जनतेचा विचार लक्षात घेऊन हा निर्णय मागे घावे अशी भावनिक मागणी त्यांनी केली.यावेळी वर्धा सोशल फोरम चे सहसचिव श्याम पर्सोडकर,चंदू राठी
रवींद्र टप्पे,अविनाश कुसुमिया,मुरली केला,दिलीप कठाने,संजय गोयंका, ऋतुराज चुडीवाले,रवी सांगतानी,अभिजित वानखेडे, सुशांत वानखेडे, चेतन काळे,नागेश तांगडे,निलेश ठाकरे,प्रवीण ढोकणे,पंकज वानखेडे,नितीन चामलाटे,राहुल भिसे,अविनाश वणकर वर्धेतील व्यापारी व अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये