ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

औद्योगिक प्रशिक्षण संस्था वर्धा येथे महिला रोजगार मेळावा संपन्न

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन केंद्र वर्धा व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वर्धा द्वारा संयुक्त विद्यमाने शासन आपल्या दारी* या उपक्रम अंतर्गत महिला रोजगार मेळावा चे आयोजन केले होते यामध्ये विविध कंपन्याना बोलावून प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या सदर कार्यक्रमाकरिता मार्गदर्शन करण्यासाठी डी आय सी तर्फ वंदना भगत उद्योग निरीक्षक व मिटकॉन तर्फे श्रीकांत कोरडे सर यांनी मार्गदर्शन केले

वर्धा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वर्धा तर्फे ठाकूर सर यांनी रोजगाराची संधी कशी उपलब्ध होइल त्या करिता आपल्याला काय करायचे आहे यावर मार्गदर्शन केले सदर कार्यक्रम संस्थेच्या प्राचार्या श्वेता कुळकर्णी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला संस्थेचे गटनिदेशक जंजाळ सर हे उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास भगत यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजना चे कार्यक्रम अधिकारी कडूकर सर यांनी सम्पूर्ण व्यवस्थापण केले तसेच संस्थेचे गिरडकर सर आणि नाखले सर व सर्व संस्थेचे सर्व कर्मचारी यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये