ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पर्यावरण सुरक्षा तथा भ्रष्टाचार निवारण संघटन जिल्हाध्यक्षपदी संदीप कोतमवार यांची निवड.

चांदा ब्लास्ट

         राष्ट्रीय मानवाधिकार पर्यावरण सुरक्षा तथा भ्रष्टाचार निवारण संघटनेच्या व अखिल हिंद महासभेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी चंद्रपूर येथील संदीप दत्तात्रय कोणतमवार यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय मानवाधिकार पर्यावरण सुरक्षा तथा भ्रष्टाचार निवारण संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भालूसिंह झाला यांनी ही निवड करून संघटनेच्या चंद्रपूर जिल्ह्याचा कार्यभार त्यांच्यावर सोपविण्यात आला आहे .त्याचप्रमाणे अखिल हिंद महासभेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मितेश पटेल यांनी संदीप कोतमवार यांची चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी निवड करून हिंद महासभेच्या चंद्रपूर जिल्ह्याचा कार्यभार त्यांच्यावर सोपविला आहे.

संदीप कोतमवार यांच्यातील सामाजिक कार्याची आवड व धडाडीचे कार्य लक्षात घेता या दोन्ही संघटनाचे कार्य ते आपल्या जिल्ह्यात योग्य रीतीने सांभाळेल असा विश्वास व्यक्त केल्या जात आहे. त्यांचे दोन्ही संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल आमदार बंटी बांगडीया, किशोर पत्तीवार, सुनील बिपटे, अरुण बुटले, अमित फृलझले यांच्यासह त्यांचे संपूर्ण जिल्ह्यात अभिनंदन केल्या जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये