ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संस्कार भारती चंद्रपूर तर्फे १० सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण राधा रुपसज्जा स्पर्धेचे आयोजन

चांदा ब्लास्ट

संस्कार भारती चंद्रपूर शाखेच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून १० सप्टेंबर २०२३ रोजी श्रीकृष्ण राधा रुपसज्जा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
विवेकनगर मुल रोड चंद्रपूर येथील श्रीराम मंदिर सभागृहात सायंकाळी 5 वा. या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ० ते ५ वर्षे आणि ६ ते १० वर्षे अशी दोन वयोगटातील स्पर्धकांसाठी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी १०० रु प्रवेश शुल्क ठेवण्यात आले असून सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कृष्ण आणि राधा या दोन्ही रुपसज्जा स्पर्धेत एकत्र राहणार आहे. या साठी स्वतंत्र पारितोषिक देण्यात येणार नाही.
० ते ५ वर्षे वयोगटासाठी प्रथम ५०० रु , द्वितीय ३०१ आणि तृतीय २०१ रु रोख व प्रमाणापत्र तसेच ६ ते १० वर्षे वयोगटासाठी प्रथम १००१ रु , द्वितीय ७०१ रु आणि तृतीय ५०१ रु रोख व प्रमाणपत्र अशी पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धेचे प्रवेश शुल्क ९४२१८१२३६२ या गुगल पे / फोन पे क्रमांकावर स्वीकारले जातील. स्पर्धेच्या संयोजक नूतन धवने या असून अधिक माहिती व संपर्कासाठी सौ संध्या विरमलवार ९४२२१३५४५१, मंगेश देऊरकर ९८५०३६०८७५ आणि डॉ राम भारत बाल रुग्णालय ९०९६८२४९५२
यांच्याशी संपर्क साधावा . या स्पर्धेत बालकांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्कार भारती चंद्रपूर परिवाराने केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये