
चांदा ब्लास्ट :
अतुल कोल्हे भद्रावती –
शहरातील सुमठाना परिसरात राहते घरी पैशाची बाजी लावून जुगार खेळत असताना भद्रावती पोलिसांनी धाड टाकून 10 आरोपीसह रोख रकमेसह पाच लाखाचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई गुरुवारला रात्र दरम्यान करण्यात आली.
सुमित शहा, हसन शेख, मोहम्मद शकील, आयाज शेख, निलेश बनसोड, शहानवाज शेख, गोपाल फुंड , निलेश रामटेके हे सर्व राहणार सुमठाना आश्विन घायवन, कुणाल देऊळकर राहणार घोटनिंबाळा असे आरोपींचे नाव आहे. हे वरील आरोपी सुमित शहा यांच्या सुमठाना येथील राहते घरी पैशाची बाजी लावून जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाली त्या आधारे ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक किटे, शशांक बदामवार . अनुप, विश्वनाथ, निकेश ढेंगे यांनी सापडा रचून कारवाई केली यात रोख रक्कम, मोबाईल, मोटरसायकल असा एकूण पाच लाखाचा मुद्देमाल जप्त केला यातील दाही आरोपींना अटक करण्यात आली आहे.