ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा

पोलीस पाल्यांकरीता, सेवानिवृत्त पोलीसांच्या पाल्यांकरीता, गृहरक्षकांच्या पाल्यांकरीता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

वर्धा जिल्हा पोलीस दल व ईला हायरिंग टेक्नोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 25.08.2023 रोजी पोलीस मुख्यालय येथील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे वर्धा जिल्हा पोलीस दल व ईला हायरिंग टेक्नोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमानाने पोलीस पाल्यांकरीता, सेवानिवृत्त पोलीसांच्या पाल्यांकरीता, गृहरक्षकांच्या पाल्यांकरीता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमांचे प्रमुख अतिथी मा.ना. श्री रामदासजी तडस, खासदार, लोकसभा वर्धा जिल्हा मतदारसंघ, वर्धा यांचे हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. पोलीस अधीक्षक वर्धा श्री नूरुल हसन व उपाध्यक्ष डॉ. सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, ईला हायरिंग टेक्नोलॉजी चे संचालक श्री अंकित हिवरे यांचे उपस्थीत करण्यात आले.

सदर रोजगार मेळाव्यामध्ये उमेदवारांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला. वर्धा जिल्हा नागपूर जिल्हयातील नामांकीत कंपन्या स्टेट बॅंक ऑफ इंडीया, इरॉस हयुदई, अॅबको कॉम्युटर, आरोही इंन्फो, वी फलायओरीयस टेक्नोलॉजी, एलआयसी, पटेल एंडस्कील फाउंडेषन, धूत ट्रांसमिषन, ईला हायरिंग टेक्नोलॉजी इत्यांदी उमेदवारांचे साक्षात्कार घेवून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली.

कार्यक्रमाअंती श्री नूरुल हसन साहेब यांनी निवड झालेल्या एकुण 28 उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप केले व इतर 52 उमेदवार यांची अंतिम निवड कंपनीचे संचालकाकडुन होणाऱ्या मुलाखाती करीता राखुन ठेवण्यात आलेली आहे.

ज्या उमेदवारांची काही कारणास्तव निवड होवू शकली नाही अश्यांना सुध्दा आजचा अनूभव गाठीशी ठेवून पुनश्च नवीन जोमाने व हिम्मतीने तयारी करण्याकरीता श्री नूरुल हसन साहेब यांनी प्रोत्साहीत केले.

सदर कार्यक्रमाचे यषस्वीतेकरीता राखीव पोलीस निरीक्षक श्री कमलाकर घोटेकर, सपोनि. श्री संदिप कापडे व कर्मचारी सायबर शाखा, वर्धा, सपोनि. श्री लक्ष्मण लोकरे, व कर्मचारी पोलीस कल्याण शाखा, वर्धा यांनी प्रयत्न केले. रोजगार मेळाव्याकरीता उपरोक्त कंपनीचे प्रतिनिधी व एकुण 300 उमेदवार यांनी उपस्थीती नोंदविली.

              पोलीस अधिक्षक, वर्धा करीता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये