Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ड्रोनद्वारे फवारणी सेवेची सुरुवात

सलाम किसानचा उपक्रम ; शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्याचे उद्दिष्ट

चांदा ब्लास्ट

शेतकऱ्यांना प्रभावी तंत्रज्ञान-सक्षम उपायांसह समाधान उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारताचे वाढते डेटा-संचालित कृषी व्यासपीठ सलाम किसानने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी उत्पादक संस्था (FPOs)च्या सहकार्याने पहिल्यांदाच ड्रोनद्वारे फवारणी सेवा उपलब्ध करून दिली आहे.

या विशिष्ट उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री वने, सांस्कृतीक कार्य, मत्स्यव्यवसाय महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, जि. चंद्रपूर यांच्या हस्ते जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव २०२३, कृषी भवन, चंद्रपूर येथे करण्यात आले होते. यानिमित्त पार पडलेल्या कार्यक्रमात राज सिडाम आणि अमोल कोहरे हे सलाम किसान ने तयार केलेले चंद्रपूर जिल्ह्यातील पहिले आदिवासी ड्रोन पायलट आहेत, यांना कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल मंत्री मा. श्री. सुधीर मुनगंटीवार याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत सलाम किसानने शेतकरी उत्पादक संस्थांसोबत सहकार्य केले आहे जेणेकरून ड्रोन फवारणी सेवा शेतकर्‍यांपर्यंत पोहचवण्यासाठी सहज उपलब्ध आणि परवडणारी बनवता येईल. ड्रोनला एक कार्यक्षम, कीटक व्यवस्थापन आणि कृषी रसायनांचा अचूक वापर करण्यासाठी घरोघरी पोहचवून शेतकऱ्यांना अत्याधुनिक फवारणी क्षमतांसह सुसज्ज करण्याचा कंपनीचा मानस आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय ८५ – ९०% आणि उत्पादनाचा वापर २० – ३०% कमी होतो, ज्यामुळे शाश्वत शेतीकडे प्रगती होते.

सलाम किसानच्या संस्थापिका आणि सीईओ धनश्री मानधनी म्हणाल्या, “सलाम किसानमध्ये, आम्ही ग्रामीण समुदायांना लवचिकता आणि टिकाऊपणासाठी सक्षम करण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि तळागाळातील बदलाची अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी संस्थांमधील सहकार्य महत्त्वपूर्ण ठरेल. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनवर माझा विश्वास आहे की शेतकरी उत्पादक संस्था लहान शेतकर्‍यांना मोठी शक्ती देणार आहेत आणि सरकरी आणि खाजगी कंपन्यांच्या एकत्र येण्यामुळे विकसित भारताकडे नेले जाईल. आमच्या राष्ट्रीय कृषी धोरणाचे उद्देश्य २०२५ पर्यंत १०,००० नवीन शेतकरी उत्पादक संस्था स्थापन करण्याचे आहे, ज्यात कृषी मूल्य साखळी सुधारणे आणि ग्रामीण भागातील रसद (विकास) वाढीस उत्प्रेरित करणे. या स्वातंत्र्यदिनी शेतकरी उत्पादक संस्थाच्या सहकार्याने ड्रोन-आधारित फवारणी सेवा सुरू करणे हे या व्हिजनसाठी आमच्या संस्थेकडून वचनबद्धतेचा पुरावा आहे.”

“सामान्यतः पारंपारिक पंप फवारणीसाठी प्रति एकर १०० – १२० लिटर पाणी वापरले जाते, आणि ड्रोन फवारणीसाठी १० लिटर प्रति एकर पाण्याचा वापर होतो. पारंपारिक फवारणीसाठी वेळ जास्त लागत असते आणि त्यासाठी अधिक मेहनतीची आवश्यकता असते, तर ड्रोन फवारणीसाठी ७ ते ८ मिनिटे लागतात. ड्रोन सेवेला शेतकऱ्यांसाठी सुलभ बनवून, आम्ही इनपुट खर्च कमी करण्यात, कार्यक्षमता वाढविण्यात आणि शेतकऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात मदत करत आहोत. मुळात, आमचा शेतकरी, कृषी परिसंस्था तसेच  शेतकरी उत्पादक संस्थांचा फायदा करण्याचा आमचा हेतू असल्याचे सलाम किसानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय खोब्रागडे यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये