ताज्या घडामोडी

राका ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी शंकर मेंढे बिनविरोध – पत्रकार अरविंद मेंढे व इतर सदस्यांचीही झाली निवड

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

सडक /अर्जुनी: दिनांक 24 ऑगस्ट – तालुक्यातील राका येथील ग्रामपंचायतची ग्रामसभा 22 ऑगस्ट रोजी राका ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत भवनासमोरील पटांगणात पार पडली.

यावेळी झालेल्या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी शंकर मेंढे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. तर सदस्यपदी पत्रकार अरविंद मेंढे यांसह अन्य इतर सदस्यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये