ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

यशवंत संस्थेच्या वतीने आमदार सुधाकर अडबाले व आमदार अभिजीत वंजारी यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश ना

शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेली नामांकित यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने 20 ऑगस्ट रोजी दुपारी 12.00 वा. नवनिर्वाचित शिक्षक आमदार सुधाकर अडबाले व पदवीधर

मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी यांचा सत्कार यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार प्रा सुरेशभाऊ देशमुख यांच्या हस्ते स्थानिक यशवंत महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न होणार आहे.

यशवंत संस्थेच्या 22 शाळा, 9 कनिष्ठ महाविद्यालये व 4 वरीष्ठ महाविद्यालये व 1 अभियांत्रिकी महाविद्यालय
वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत.

सदर सत्कार सोहळा कार्यक्रमास यशवंत संस्थेशी संबंधित सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख, उपाध्यक्ष सतिश राऊत व संस्थेच्या संचालकांनी केलेले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये