Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोटर सायकल चालक व प्रवाशांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन करून प्रबोधन व जनजागृती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज 18/08/2023 रोजी मा.अपर पोलीस महासंचालक साहेब (वा) म. रा. मुंबई, मा.पोलीस अधिक्षक, महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही psi जे. एन. लाकडे व पोलीस स्टाफ Hc/179 जाधव, Npc/217 राजूरकर Npc/2191 उके असे मिळून NH-44 रोडवरील करंजी ते पांढरकवडा यादरम्यान मंगी फाट्यावर रोडच्या कडेला सुरक्षित ठिकाणी मोटर सायकल चालक व प्रवाशांना थांबवून वाहतूक नियमांचे पालन करणेबाबत मार्गदर्शन करून प्रबोधन व जनजागृती करण्यात आली. खालील प्रमाणे वाहतूक नियमांचे पालन करणे बाबतच्या सूचना देण्यात आल्या.
१) वाहन चालवण्याचा परवाना असल्याशिवाय वाहन चालवू नये
२) वाहन चालवितांना मोबाईल फोनचा वापर टाळावा.
३) गाडीचे कागदपत्रे नेहमी सोबत ठेवावी. नेहमी हेल्मेट चा वापर करावा
४) वाहनांवर विशेषतः पाठी मागील बाजू रिफ्लेक्टर लावावे
५) दारू पिवून वाहन चालवू नये.
६) महामार्गावर धोकादायक परिस्थितीत कोणतेही वाहन थांबवू नये.
७) नेहमी ओव्हरटेक करतांना उजव्या बाजूने करावे.
८) वाहन चालविताना वेग मर्यादाचे पालन करावे.सुरक्षित अंतर ठेवावे
९) विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये.
१०) वाहन चालवताना वाहतूक चिन्हे पाहून त्या सूचना प्रमाणे वाहन चालवावे.
११) चारचाकी वाहन चालवताना चालक तसेच सर्वच प्रवाशांनी सीटबेल्ट वापरावे.
१२) ट्रिपल सिट प्रवास करु नये.
१३) अपघात ग्रस्ताना मदत करावी.
१४) मृत्युंजय दूत संकल्पनेची सविस्तर माहिती देण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये