ताज्या घडामोडी

हिंदु देवतांबद्दल अश्लील पोस्ट मुळे चंद्रपुरात तणाव – विशिष्ट समुदायातील युवकाने समाज माध्यमावर केली पोस्ट

हिंदु संघटना आक्रमक - अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया चंद्रपूर

चंद्रपूर येथील दादमहाल परिसरात राहणाऱ्या विशिष्ट समाजाच्या एका अल्पवयीन युवकाने (अंदाजे 17 वर्ष) हिंदुंच्या देवतांबद्दल इंस्टाग्राम ह्या समाज माध्यमावर काही दिवसांपूर्वी अत्यंत अश्लील व आक्षेपार्ह पोस्ट केली. ही पोस्ट काही हिंदु नागरिकांनी बघितल्यानंतर त्यांनी याबद्दलची माहिती विश्व हिंदु परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना दिली.

 

अत्यंत खालच्या दर्जाची अश्लील पोस्ट बघुन दोन्ही हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली व संबंधित युवकाला अटक करण्याची मागणी रेटून धरली. ही माहिती कळताच हिंदु नागरिकांनी शहर पोलीस ठाणे गाठून घोषणाबाजी सुरू केली.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन त्या अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतले असून त्या पोस्ट बद्दलची तांत्रिक माहिती घेण्यास सुरुवात केली आहे तसेच संबंधित युवकाच्या मोबाईल मधुन इतर माहिती गोळा करण्यासाठी सायबर शाखेकडे तो मोबाईल पाठविण्यात येणार असल्याचे ठाणेदार राजपुत ह्यांनी सांगितले. शहराची शांतता व सौहार्द कायम ठेवण्याचे आवाहन देखिल पोलीस निरीक्षक राजपूत ह्यांनी चंद्रपूर वासियांना केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये