गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीत दारूबंदी कायद्याने कार्यवाही

एकूण ३ लाख २३ हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक.18.08.2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा पथकाद्वारे हिंगणघाट डिव्हिजन मधील पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीत अवैद्य धंद्यावर कार्यवाही करिता पेट्रोलिंग करीत असताना मुखबीर द्वारे मिळालेल्या माहितीवरून मौजा जामणी येथे नाकेबंदी करून प्रो रेड केला असता आरोपी महेश प्रभाकर कांबळे वय 23 वर्ष रा. संत कबीर वार्ड हिंगणघाट मोपेड गाडी देशी विदेशी दारूसह मिळून आला तसेच आरोपी शुभम डेहाने रा. संत कबीर वार्ड हिंगणघाट हा मोक्यावर स्वतःचे ताब्यातील मोपेड गाडी व देशी विदेशी दारू सोडून पसार झाला.

आरोपीताच्या ताब्यातून 1) देशी दारूच्या 90 एम एल च्या प्रीमियम डीलक्स संत्रा कंपनीच्या 950 शिशा प्रति 100/- रू प्रमाणे 95,000/- रु 2) विदेशी दारू ने भरलेल्या ऑफिसर चॉईस ब्ल्यू कंपनीच्या 180 एम एल च्या 96 सीलबंद शीशा प्रति शीशी 350/- रुपये प्रमाणे 33,600/- रुपये 3)विदेशी दारू ने भरलेल्या रॉयल स्टॅग कंपनीच्या 180 एम एल च्या 15 सीलबंद शीशा प्रति शीशी 350/- रुपये प्रमाणे 5,250/- रु 4) एक जुनी वापरती ग्रे रंगाची एक्टिवा मोपेड गाडी क्रमांक एम एच 32 ए एम 6428 की. 90,000/- रु. 5) एक जुनी वापरती सिल्वर ग्रे रंगाची TVS ज्युपिटर मोपेड गाडी बिना क्रमांकाची की. 90,000/- रु. 6) एक अँड्रॉइड मोबाइल किंमत 10,000/- रु.असा जु.कि 3,23,850/- रु.चा* मुद्देमाल.जप्त करून आरोपी महेश कांबळे यास सदर देशी-विदेशी दारुबाबत विचारपूस केली असता विलेज रेस्टॉरंट -बार सावंगी असोला जि.नागपूर येथुन दारू साठा आणल्याचे सांगितले आहे.

करिता आरोपी 1) महेश प्रभाकर कांबळे वय 23 वर्ष रा. संत कबीर वा वार्ड हिंगणघाट 2) शुभम डेहाने(पसार) रा. संत कबीर वार्ड हिंगणघाट 3) व्हिलेज रेस्टॉरंट बार सावंगी असोला जिल्हा नागपूर (पसार) यांचे विरूद्ध पो स्टे हिंगणघाट येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक नूरूल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड स्था.गु.शा वर्धा यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, अमलदार सचिन इंगोले, प्रमोद पिसे, रामकिसन इप्पर, पवन पन्नासे, नितीन इटकरे, दिनेश बोतकर सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली*

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये