ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयातर्फे रवींद्र गोटेफोडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

           स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी प्रaयोगशाळा सहाय्यक श्री रवींद्र दामोदर गोटेफोडे यांना दिनांक 31 जुलै 2023 रोजी महाविद्यालयातर्फे सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय व भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल एस लडके सत्कार मूर्ती श्री रवींद्र दामोदर गोटेफोडे,  सविता रवींद्र गोटेफोडे व कु रागिनी रवींद्र गोटेफोडे उपस्थित होते.

सर्वप्रथम उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले याप्रसंगी प्राध्यापक डॉ. नरेंद्र हरणे, प्राध्यापक डॉ. राजेश हजारे, प्राध्यापक डॉ अजय दहेगावकर, प्राध्यापक कु जॉन मॅडम, विशाल गौरकार व विजय मदनकर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत रवींद्र गोटेफोडे यांच्या कार्याची माहिती दिली.

याप्रसंगी सत्कारमूर्ती श्री रवींद्र दामोदर गोटेफोडे यांचा शाल , श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार प्राचार्य डॉ एल एस लडके यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी श्री रवींद्र दामोदर गोटेफोडे यांनी महाविद्यालयात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडीत दिलेल्या सेवेबद्दल खुश असल्याबाबत समाधान व्यक्त करीत आपले विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल एस लडके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात एखादा व्यक्ती किती दिवस जगला यापेक्षा तो कसा जगला व त्याच्या चांगल्या जगण्याने त्याच्या कुटुंबाचे व समाजाचे कसे बरे झाले हे महत्त्वाचे आहे तसेच श्री रवींद्र गोटेफोडे यांनी या महाविद्यालयात 24 वर्ष सेवा दिल्याबद्दल त्यांचे निवृत्तीनंतरचे जीवन सुखमय आनंदित व परिवारासोबत जगावे व त्यांना दीर्घ आयुष्य लाभो व ते आमच्या सर्वांच्या सतत आठवणीत राहतील असे आपले मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक डॉ सौ अपर्णा धोटे तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ गजेंद्र बेदरे यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्राध्यापक Lt सचिन श्रीरामे, प्राध्यापक कुलदीप भोंगडे, शरद भावरकर, कुशाल मानकर, विजय मदनकर, श्री विशाल गौरकार, नंदा बुरडकर यांनी अथक परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये