Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांचे कार्य प्रेरणादायी – मा.ना. सुधीर मुनगंटीवार

भाजपा जनसंपर्क कार्यालयात अहिल्‍यादेवी होळकर पुण्‍यतिथीनिमित्‍त अभिवादन

चांदा ब्लास्ट

पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर या भारतातील तत्‍त्‍वज्ञानी महाराणी होत्‍या. त्‍यांनी बुध्‍दीचातुर्याच्‍या बळावर लोकाभिमूख कार्य करुन जनतेच्‍या कल्‍याणाकरिता कृतीशिल कार्य केले आहे. त्‍यामुळे त्‍यांचे नाव भारताच्‍या इतिहासात सोनेरी अक्षरांनी कोरल्‍या गेले आहे. अहिल्‍यादेवी होळकर यांनी सर्वधर्म समभाव, अस्‍पृश्‍यता उच्‍चाटन, सामाजिक एकात्‍मता स्‍त्री पुरुष समानता, शेतकरी, शेतमजूर यांचेकरिता उपयुक्‍त कार्य यासारख्‍या अनेक सामाजिक सुधारणा करुन लोककल्‍याणकारी कार्य केले आहे. असे मत राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री मा. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केले.

दिनांक १३ ऑगस्‍ट २०२३ रोजी गिरणार चौकातील जनसंपर्क कार्यालयामध्‍ये पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांच्‍या पुण्‍यतिथीनिमित्‍त त्‍यांना अभिवादन करण्‍यात आले. यावेळी भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष राहूल पावडे, तुषार सोम, सचिन कोतपल्‍लीवार, दिनकर सोमलकर, रवी लोनकर, डॉ. भारती दुधाणी, , चॉंद सय्यद, मनोज पोतराजे, सुनिल डोंगरे, संजय पटले, मोनिषा महातव, रेणुका घोडेस्‍वार, राजेश  यादव, प्रविण गुरमवार, धनराज कोवे, अक्षय शेंडे, मुग्‍धा खांडे, जयश्री आत्राम, अजय सरकार, आमिन शेख, पुरुषोत्‍तम सहारे, वंदना संतोषवार, प्रभा गुडधे, अमोल मत्‍ते, आकाश ठुसे, रितेश वर्मा, राम हरणे, विनोद शेरकी, आकाश मस्‍के, बलराम शाह, शेखर शेट्टी, ओमेश आयलु, रवीशेखर कादासी, मनोज सिद्दा, गणेश रामगुंडावार,  यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

अहिल्‍यादेवी होळकर यांनी समर्थपणे कल्‍याणकारी राज्‍य चालवुन समाजकारण, राजकारण, सांस्‍कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, कृषी, पानलोट यासारख्‍या अनेक क्षेत्रांमध्‍ये यशस्‍वी कार्य केले आहे. त्‍यांनी स्‍त्री सक्षमीकरणाकरिता केलेले कार्य अजरामर आहे., असेही सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले. यावेळी उपस्थितांच्‍या वतीने माल्‍यार्पण करुन त्‍यांच्‍या स्‍मृतिंना वंदन करण्‍यात आले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये