Sudarshan Nimkar
गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दारुबंदी कायद्याअन्वये सेलू पोलीसांची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 12/08/2023 रोजी मौजाआर्वी लहान शेत शिवारातील नाल्याचे काठावर रविंद्र कळमकर रा. सुकळी स्टेशन हा प्रवीण थुल याच्या गावठी मोहा दारुच्या हातभट्टी करिता कच्चा मोहा रसायन सडवा तयार करिता आहे अशी मुखबीरकडून खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पंच व पोस्टापसह मुखबीर यांचे माहीतीप्रमाणे मौक्यावर जावून छापा टाकला असता मौक्यावर आरोपी नामे रविंद्र शामराव कळमकर वय-50 वर्ष, रा. सुकळी स्टे. ता. सेलू, जि.वर्धा हा गावठी मोहा दारु करिता कच्चा मोहा रसायन सडवा तयार करतांना मिळून आल्याने त्याचे मौक्यावर 10 प्लास्टीक ड्रम मध्ये कच्चा मोहा रसायन सडवा 1000 लीटर व ईतर भट्टी साहीत्य असा एकूण जु.कि. 1,13,400/- रु. चा माल मिळून आल्याने मौक्यावर नाश करण्यात आला असून आरोपी नामे क्र. 1 रविंद्र शामराव कळमकर वय-50 वर्ष, क्र. 2 प्रविण आत्माराम थुल वय-50 वर्ष, दोन्ही रा. सुकळी स्टे. ता. सेलू, जि.वर्धा रा. सुकळी स्टे. ता. सेलू, जि.वर्धा याचे विरुध्द पोलीस स्टेशन सेलू येथे कलम 65 एफ मदाका अन्वये कार्यवाही करण्यात आली.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे, मा, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रोशन पंडीत यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सपोनि. तिरुपती राणे पो.स्टे सेलू यांचे निर्देशाप्रमाणे डी. बी. पथकाचे पोलीस अंमलदार गणेश राऊत, ज्ञानदेव वनवे, यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये