Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसेना (उबाठा) पदाधिकारी शिवसैनिक जनतेच्या दारी

शिवसेना (उबाठा) ही जनतेच्या न्याय हक्क सेवेसाठी सदैव तत्पर: रविंद्र शिंदे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

हिन्दुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी सुसंगत ब्रिदवाक्य ८०% समाजकारण व २०% राजकारण मुलमंत्र अंगीकृत करीत शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख तसेच माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन शिवसेना नेते खासदार संजय राऊत, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, पूर्व विदर्भ महीला सघंटीका तथा प्रवक्ता शिल्पाताई बोडखे, युवासेना पूर्व विदर्भ सचीव निलेश बेलखेडे तसेच वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे व उप-जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे यांच्या मार्गदर्शनात वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील गावागावात शिवसेना (उबाठा) पदाधिकारी हे गावखेडयातील जनतेचे प्रश्न समस्या सोडविण्याकरीता जनतेच्या दारी पोहचण्याचा विडा उचलला आहे.

याचाच एक भाग तालुकाप्रमुख नंदू पढाल यांच्या नेतृत्वात शहरप्रमुख घनश्याम आस्वले तसेच युवासेना अधिकारी राहुल मालेकर हे भद्रावती तालुक्यातील चिंचोली या गावात आढावा बैठक घेत चिंचोली ग्रामस्थ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे.

याप्रसंगी गावकऱ्यांनी २ प्रमुख समस्या उपस्थित केल्या.त्यात वनविभागाकडून वन्यप्राण्यापासून गावकऱ्यांच्या संरक्षणाकरीता गावाला जाळीचे कुंपन अद्यापही पुर्ण झालेले नाही. ते तात्काळ मार्गी लावण्यात यावे. अशी मागणी उपसरपंच महेश सागोरे यांनी केली.चिंचोली गाव हे जंगलाला लागून असल्याने वाघाची भिती असून येथील विद्यार्थ्याना २ किलोमीटर चोरा येथे शाळेत जावे लागते. परीवहनाची सोय नसल्याने गेल्या 10 वर्षापासून विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे.त्वरित बंद असलेली बस सेवा सुरु करुन देण्याची मागणी केली.

या आढावा बैठकिला तालुकाप्रमुख तथा नगरसेवक न. प भद्रावती नंदू पढाल, युवासेना तालुका अधिकारी राहुल मालेकर, चोरा ग्रा.प. उपसरपंच तथा शिवसेना विभाग प्रमुख विलास जीवतोडे, ग्रा.प. उपसरपंच महेश सागोरे, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रा.प. माजी सरपंच तथा सदस्य मनोहर श्रीरामे, सदस्य शेखर इखारे, जेष्ठ शिवसैनिक सखाराम श्रीरामे, नत्थु रंदये, विजय जांभुळे, सुरेश जांभुळे, दशरथ चौधरी, विनोद साव, गणपत इखारे व गावकरी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये