ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय युवा दिवस निमित्त डोळे तपासणी व डोळ्यांच्या ड्रॉपचे वितरण

मानसिक तणाव व एच आय व्ही वर जनजागृती शिबिराचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाचा उपक्रम

स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग, ग्रामीण रुग्णालय, भद्रावती व करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2023 रोजी डोळे तपासणी शिबिर डोळ्याच्या ड्रॉपचे वितरण, मानसिक ताण तणाव व एच आय व्ही रोगावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल एस लडके , प्रमुख पाहुणे श्री शितल भडके , जिल्हा समन्वयक, ग्रामीण रुग्णालय, भद्रावती , प्रमुख वक्ते व मार्गदर्शक स्वाती खोब्रागडे , जिल्हा समन्वयक, डिस्ट्रिक्ट मेंटल हेल्थ सेंटर, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज, चंद्रपूर तसेच या कार्यक्रमाच्या समन्वयक प्राध्यापिका डॉ सौ अपर्णा धोटे उपस्थित होते

सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात भद्रावती शिक्षण संस्था , भद्रावतीचे संस्थापक सचिव स्व निळकंठराव शिंदे यांच्या प्रतिमेला माल्यार्पन तसेच पाहुण्याच्या स्वागताने झाली.
याप्रसंगी प्राध्यापिका डॉ अपर्णा धोटे यांनी आपल्या प्रास्तविकेतून आंतरराष्ट्रीय युवा दिवसानिमित्त डोळे तपासणी शिबिर व आय ड्रॉपचे डिस्ट्रीब्यूशन तसेच मानसिक ताण तणाव व एच आय व्ही रोगावर जनजागृती का आवश्यक आहे तसेच आपले आरोग्य चांगले असेल तर आपली मानसिक अवस्था चांगली राहते तसेच नुकताच आपल्या जिल्ह्यात पूरामुळे उद्भवलेल्या डोळ्याच्या साथीमुळे डोळ्यांची निगा व उपाययोजना यावर प्रास्ताविकेतून प्रकाश टाकला.
या शिबिराच्या मुख्य वक्त्या स्वाती खोब्रागडे , डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर, मेंटल हेल्थ डिपार्टमेंट, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज, चंद्रपूर यांनी मानसिक आजार व त्या मागचे कारणे, मोबाईलचे व्यसन यावर प्रकाश टाकला त्यात त्यांनी बोलताना कोरोना काळात मोबाईलचा वापर केला ते तेव्हाच्या परिस्थितीनुसार परंतु आता त् त्याचा अतिवापर होताना दिसतो त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर व मानसिकतेवर दिसून येत आहे त्यामुळे आजची पिढी लवकर रागात येणे, चिडचिड करणे,झोप न लागणे, कुटुंबापासून विभक्त होत आहे यावर एकच उपाय मोबाईल कामापुरता वापरणे तसेच आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे, व्यायाम करणे हाच उपाय होय तसेच याप्रसंगी विविध व्यायामाचे प्रात्यक्षिकाचे सादरीकरण करून दाखविले ज्यामुळे आपण तणावमुक्त राहू.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल एस लडके यांनी आजच्या युवा पिढीला मोबाईलचा अतिवापरावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले तसेच आपल्यावर मोबाईल ने ताबा मिळवण्यापेक्षा आपण मोबाईलवर ताबा ठेवणे ही काळाची गरज आहे तसेच आपले आरोग्य हे धनसंपदा आहे याकरिता रोज व्यायामाची आवश्यकता आहे तसेच आजच्या युवा पिढीने आपले ध्येय निश्चित करून तशी तयारी करावी असे आवाहन केले.

यानंतर लगेच डोळे तपासणी शिबिर व डोळ्याच्या ड्रॉप चा वितरणाचा शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यात महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी तपासणी करून घेतली.

या कार्यक्रमाचे संचलन प्राध्यापक कुलदीप भोंगळे तर आभार प्रदर्शन प्राध्यापक Lt.सचिन श्रीराम यांनी केले
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्राध्यापक डॉ अजय दहेगावकर, प्राध्यापक डॉ नरेंद्र हरणे, प्राध्यापक डॉ शशिकांत शित्रे, प्राध्यापक डॉ खादरी, प्राध्यापक संदीप प्रधान, श्री प्रमोद तेलंग, कु अनामिका चौधरी, कु रागिनी निखाडे तसेच ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथील कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये