ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आयुध निर्माणी येथे 14 व 15 ला दारुगोळा उत्पादनाची प्रदर्शनी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

आजादी का अमृत महोत्सव निमित्त चांदा येथे बनविण्यात आलेल्या दारूगोळ्याचे भव्य प्रदर्शनीचे आयोजन दिनांक 14 ऑगस्ट 15 ऑगस्ट ला सार्वजनिक सभा भवन आयुध निर्माणी वसाहत येथे करण्यात येणार आहे.
आयुध निर्माणी चांदा ही शस्त्र व दारुगोळा निर्माण करणारी देशातील आयुध निर्माणी पैकी एक आहे येथे बारूद, मिसाइल, रॉकेट, टॅक निर्माण करण्यात येते तसेच येथील दारूगोळ्याला विदेशात मोठी मागणी असल्याने उत्पादन करुन विदेशात निर्यात केले जाते. आजादी का अमृत महोत्सव निमित्त जिल्ह्यातील नागरिकांना या दारूगोळ्याची माहिती व्हावी याकरिता दोन दिवस या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येणार आहे. सकाळी दहा ते रात्री पाच पर्यंत नागरिकांना बघावयास मिळणार असल्याचे आयुध निर्माणी महाप्रबंधक विजयकुमार यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये