ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आर्वीत कोंबडा जुगारावर लाठी पोलिसांची कारवाई

आरोपी ताब्यात ; १० दुचाकींसह ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ तेलंगणा सीमेवर असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील आर्वी गावाच्या मागील परिसरात कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळताच लाठी पोलिसांनी धडक कारवाई केली. मंगळवार (दि.३) दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.तर घटनास्थळावरून ७ कोंबडे, १२ मोटारसायकली, ४ कात्या आणि रोख रक्कम असा एकूण ५ लाख ३ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

तेलंगाना सीमेवर असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील लाठी परिसर संवेदनशील समजला जातो. हा परिसर अवैध धंदेवाईकांसाठी अनुकूल असा आहे. असे असताना पोलीस विभागही नेहमी अलर्ट मोडवर असते. आर्वीतील कोंबड्याच्या झुंजीवर मंगळवारी पोलिस पथकाने वनरक्षक आणि पंचासह धाड टाकली. यावेळी आर्वी गावाच्या मागे नाल्यालगत काही इसम कोंबड्यांच्या झुंज लावून त्यावर पैशांची बाजी लावत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

लाठी पोलिसांनी घटनास्थळावरून प्रवीण सुरेश दरेकर (वय ३५, रा. शिवाजी वार्ड, राजुरा) आणि प्रकाश मोतीराम वानखेडे (वय ६२, रा. विरूर) या दोघांना ताब्यात घेतले. या शिवाय १० मोटारसायकलींचे चालक घटनास्थळावरून पसार झाले. कारवाईदरम्यान ७ कोंबडे आढळून आले असून त्यापैकी ३ कोंबड्यांचा मृत्यू झालेला होता. तसेच १२ मोटारसायकली, ४ कात्या आणि आरोपींकडील १ हजार २५० रुपये रोख रक्कम असा एकूण ५ लाख ३ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी पंचांसमक्ष जप्त केला.

या प्रकरणी उपपोलीस स्टेशन लाठी येथे अप क्रमांक ६७/२६, कलम १२ (ब) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे तसेच राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशांत कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस स्टेशन लाठीचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लभाने यांनी केली.

 या पथकात पोलीस हवालदार अशोक मंजुळकर, महिला पोलीस हवालदार सौजन्या जंजिरालावार, पोलीस कॉन्स्टेबल चेतन झाडे आणि वनरक्षक कार्तिकस्वामी केंद्रे यांचा समावेश होता. कोंबड्यांच्या झुंजीच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध जुगारावर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अशा गैरप्रकारांना आळा बसेल का ? असा प्रश्न उपस्थित होत असून पसार झालेल्या दुचाकीस्वारांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये