ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडपिपरीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जागर

पुण्यतिथीनिमित्त प्रबोधन व भजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्रीराम मंदिर, गोंडपिपरी यांच्या वतीने दि. ३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबर २०२६ रोजी श्री गुरुदेव सेवा मंडळ नोंदणी प्रमाणपत्र वितरण व प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पालखी सोहळा, वारकरी भजन, ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ तसेच विविध भजन मंडळांचे सादरीकरण अशा भक्तिमय वातावरणात कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अश्विनी तोडासे होत्या. उद्घाटक म्हणून श सुरेशराव चौधरी प्रतिष्ठित नागरिक तर सहउद्घाटक मंगेश कराळे PSI गोंडपिपरी उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोडेकर, ॲड. राजेंद्र जनेकर व सेवा अधिकारी लटारू मते (राजुरा) यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून अरुण झगडकर, रामकृष्ण चनकापुरे, नरेंद्र मोहोळे, मुन्नाजी चूधरी, प्रवीण भोयर व संतोष भोयर उपस्थित होते. यावेळी श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

      दि. ३१ ऑक्टोबर रोजी पालखी सोहळ्यात वारकरी भजन व ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ सादर करण्यात आला. तर १ नोव्हेंबर रोजी करंजी, चेक दरूर, फूरडी हेटी, सुरगाव, तोहगाव व नांदगाव येथील भजन मंडळांनी सहभाग नोंदवून भक्तिमय वातावरण निर्माण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अनिल ताडशेत्तीवर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रमेश हुलके यांनी तर आभार प्रदर्शन श्री किशोर भोयर सर यांनी केले.

      कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष बंडूजी पुडके, उपाध्यक्ष बंडू वायकोर, सचिव प्रदीप ताटशेट्टीवार, सहसचिव डॉ. अनिल ताटशेट्टीवार, दामोधर तेलावर, महिला अध्यक्ष चंद्रकला वायकोर, सचिव सविता मेहरकुरे यांच्यासह संतोष जुवारे, परमानंद पल्हाडे, तसेच मंडळाच्या सर्व पदाधिकारी, सदस्य व महिला सदस्यांनी विशेष सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये