ताज्या घडामोडी

चंद्रपूर आगारातील चालक वाहकांचे शेड्यूल नियमबाह्य

चांदा ब्लास्ट :
चंद्रपूर : चंद्रपूर आगारातील व विभागाच्या प्रत्येक आगारातील सर्व चालक व वाहक यांचे शेड्यूल नियमबाह्य व बेकायदेशीर असल्याचा आरोप एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने केला आहे.
केंद्र शासनाने राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अधिसूचित केल्याप्रमाणे रा.प. महामंडळच्या बसच्या प्रकारानुसार व वर्णनानुसार आणि रस्त्याचा प्रकारानुसार सिमेंट रस्ते, डांबरी रस्ते, डांबरी पण खडबडीत रस्ते, कच्चे रस्ते यासाठी कमाल व किमान वेग मर्यादा निश्चित केली आहे. मात्र, चंद्रपूर आगार व विभागात या नियमाचे उल्लंघन करून शेड्यूल तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे नियमानुसार चालक, वाहकांचे शेड्यूल तयार करण्यात यावे, अशी मागणी कृती समितीने केली आहे. तसेच जागोजागी लावून दिलेल्या चिन्हानुसार किमान आणि कमाल वेगानुसार चालक व वाहक यांचे शेड्यूल तयार करण्यात यावे. मोटार वाहन कायदा १९८८ नुसार वाहन चालकाचे व वाहकाचे वाहन चालविण्याच्या कामाचे तास ८ तासाच्यावर काम करावयाचे नाही आणि एका वेळेस ५ तासाच्या वर स्टेअरिंगवर बसवयाचे नाही, अशी तरतूद असताना मोटार वाहन कायदाच्या तरतुदीचे उल्लंघन करून चालक व वाहकांना अधिक तास काम दिले जात आहे. मोटार वाहन कायदा १९८८ कलम ८४ नुसार रा.प. महामंडळाच्या बसला कायद्यान्वये विहित केलेल्या वेगानुसार चालक व वाहक यांचे शेड्युल्ड बनविण्यात यावेत. मोटर्स वर्कर्स ॲक्ट १९६९ नुसार चालक व वाहक यांनी सलग ५ तास काम केल्यानंतर त्यांना आरामासाठी अर्धातास विश्रांती दिली पाहिजे. त्या खंड काळात चालक व वाहक यांना कोणतेही काम सांगता येणार नाही, या नियमांचे पालन करण्यात यावे आदी मागण्यांकडे निवेदनाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले. निवेदन विभाग नियंत्रक यांना देण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये