ताज्या घडामोडी

न्यू इरा शाळेत योग सोपान कार्यक्रमाचे राजस्थानी महिला मंडळाने केले आयोजन

विद्यार्थ्यांना दिले योग साधनेतून आरोग्याचे वाण केले नोटबुक व पेन चे वितरण

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राजस्थानी महिला मंडल,राजूरा ने अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महिला संगठन अंतर्गत संस्कार सिद्धा बाल तथा किशोरी विकास समिति व गीता परिवाराच्या संयुक्त विद्यमाने शहरातील प्रसिद्ध न्यू इरा शाळेच्या प्रांगणात अधिक महिन्याचे औचित्य साधुन योग सोपान भाग 1 चे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र योग शिक्षक संघ संघाचे संस्थापक सदस्य तथा प्रसिद्ध योग शिक्षक मधुकर शेरकी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा योग मार्गदर्शकाच्या भूमिकेत उपस्थित होते. आपल्या संबोधनातून त्यांनी योग व त्याचे महत्त्व, मानसिक व शारीरिक आरोग्य जपण्यासाठी योगाभ्यासाने होणारे फायदे ह्याविषयी मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांच्या विकासाकरिता आवश्यक असलेल्या विविध आसनांची प्रात्यक्षिके करून विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण दिले.

राजस्थानी महिला महिला मंडळ शाखा राजुराच्या वतीने शाळेतील 150 विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन व बिस्कीट पूड्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन शाळेच्या शिक्षिका वीणा देशकर ह्यांनी केले तर कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल शिक्षिका नमिता वाटेकर ह्यांनी आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्षा रचना नावंधर, उपाध्यक्षा सुशीला सोनी, कोषाध्यक्षा स्वरूपा झंवर, माजी अध्यक्षा अनिता झंवर, लता चांडक, संतोष झंवर, मीना चांडक, स्नेहा चांडक, अर्पणा बजाज, गंगा सारडा, सपना सारडा, राधा पनपालिया, प्रीति शर्मा ह्यांनी विशेष योगदान दिले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये