ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चिंतामणी महाविद्यालय, घुग्घूस येथे मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमांतर्गत पंचप्रण सामूहिक शपथ घेताना विद्यार्थी व कर्मचारी वृंद

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. घुग्घुस

चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळ, बल्लारपूर द्वारा संचालक चिंतामणी महाविद्यालय, घुग्घूस येथे दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोज बुधवारला 10 वाजता मेरी माती मेरा देश या कार्यक्रमा अंतर्गत पंचप्रण सामूहिक शपथ घेण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. रवी धारपवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी विचार मंचावर डॉ. माधव कांडणगिरी, मराठी विभाग प्रमुख प्रा. महेंद्र कुंभारे, समाजशास्त्र विभाग प्रमुख तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख, डॉ. नितीन कावडकर अर्थशास्त्र विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. रवी धारपवार यांनी मेरी माती मेरा देश या शासनाच्या अभियानाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. भारत हा विकसनशील देश असून त्याला आपणास विकसित करायचं आहे.

देशाचा विकास साधताना मातीशी जुळून राहणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाच्या मनात देशाबद्दल प्रेम असावे व देशातील समृद्धी विषयी गर्व असावा. प्रत्येक नागरिकांनी आपले कर्तव्य बजावून एकता व एकजुटीने राहावे. देशाचे संरक्षण करणाऱ्या विषयी मनात आदर असावा त्यांचा सन्मान करावा. भारताला 2047 मध्ये विकसित देश करण्याचे स्वप्न साकार करायचे आहे. असे मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष, डॉक्टर रवी धारपवार त्यांनी केली त्यानंतर सर्व विद्यार्थी व कर्मचारी वृंदांना मेरी माटी मेरा देश चे सामूहिक शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. नितीन कावडकर यांनी केले तर आभार प्रा. मंगेश जमदाडे यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये