ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नॉट फॉर रिसेल सिमेंट प्रकरणाची चौकशी सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर – तालुक्यातील मौजा बाखर्डी येथील जनसुवीधा अंतर्गत २० लक्ष रुपयांचे ग्रामपंचायत भवनाचे बांधकामात नॉट फॉर रिसेल सिमेंटचा वापर करत असल्याची तक्रार गटविकास अधिकारी कोरपना यांचेकडे आली. त्यांनी तात्काळ जिल्हा परिषद उपअभियंता बांधकाम उपविभाग, जिवती यांना सदर बांधकामाची चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे पत्र दिल्याने बांधकाम विभाग खडबडून जागा होऊन चौकशीला लागल्याने तालुक्यातील शासनाच्या बांधकामात मिलावटी गैरप्रकार करणाऱ्या कंत्राटदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

बाखर्डी येथे जनसुविधा अंतर्गत ग्रामपंचायत भवनाचे २० लक्ष रुपयांचे बांधकाम सुरू आहे. त्या बांधकामाला वापरण्यात येणारे अल्ट्राटेक सिमेंटचे नॉट फॉर रिसेल लिहिलेल्या सिमेंट चा वापर होत असल्याने सदर बांधकामाची चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकरी करीत होते. बांधकाम उपविभागाच्या अधिकारी यांच्या कडून मिळालेल्या चौकशीत ९ बॅग अल्ट्राटेकचे सिमेंट ज्यावर नॉट फॉर रिसेल असे लिहिले असल्याचे आढळून आले असून काही बॅग सिमेंट भवनाच्या बांधकामात आता पर्यंत वापरण्यात आल्याचे निदर्शनात आले पुढील चौकशी सुरू असून सध्यातरी काम थांबविण्याचे निर्देश देण्यात आले. नॉट फॉर रिसेल हे सिमेंट कंपनीतील दत्तक गावातील सीएसआर च्या बांधकामात कंत्राटदार वापरत असल्याची माहिती होती परंतु हेच सिमेंट शासनाच्या ग्रामपंचायत भवनच्या बांधकामात वापरण्यात येत असल्याच्या चर्चा गावकऱ्यामध्ये होती. सदर बांधकामाचे कंत्राटदार सादिक शेख यांनी चक्क शासनाची दिशाभूल करून शासनाच्या बांधकामात नॉट फॉर रिसेलचे सिमेंट वापर करीत असल्याने नेमके हे सिमेंट सदर कंत्राटदाराकडे आले तरी कुठून असा प्रश्न आता गावकऱ्यात निर्माण झाला आहे. गावचे सरपंच व पदाधिकारी यांचे याकडे नेमके दुर्लक्ष कसे? सरपंच अरुण रागीट हेच अल्ट्राटेक सिमेंट मध्ये कंत्राटदार आहे. सीएसआर मधील गावामध्ये ते कामे करत असतात. त्यामुळे सिमेंट आले कुठून अशा उलट- सुलट चर्चाना उधाण आले आहेत.

बाखर्डी येथील ग्रा.प.भवनाच्या बांधकामात बॅग नॉट फॉर रीसेल सिमेंटच्या ९ बॅग स्टॉक मध्ये आढळून आल्या तसेच काही बॅग सिमेंट बांधकामात वापर केल्याचे निदर्शनात आले तसेच पुढील तपास सुरू असून सध्या काम थांबविण्याची निर्देश दिले आहे

एम. पी. माथनकर

उपअभियंता, जि.प.बांधकाम उपविभाग जिवती

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये