ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवेगाव पांडव येथे ए.टी.एम. सुविधा देणार – संतोषसिंह रावत

सरपंचा एड.रामटेके यांचा पुढाकार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संजय पडोळे

ग्राम पंचायत नवेगाव पांडव ने केलेली ए.टी.एम. ची मागणी परिसरातील जनतेच्या हिताची व बँकेला अधिक लोकभिमुख करणारी असून लवकरात लवकर नवेगाव येथील शाखेत ए.टी.एम.मशीन बसविण्यात येईलच असा शब्द देत जिल्हा मध्यवतीं सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी या संबंधाने दोन दिवसात पाहणी करण्याची सुचना बँकेच्या अधिकाऱ्यांना केली.

नवेगाव पांडव च्या सरपंचा ऍड. शर्मिला रामटेके यांनी मूल येथे संतोषसिंह रावत यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून ग्राम पंचायत ची ए.टी.एम. मशीनची लोकहितासाठी मागणी करणारे विनंती पत्र दिले.

नवेगाव पांडव येथे बैकेची शाखा आहे. नवेगाव व मिंथूर या गावांची एकत्रीत लोकसंख्या ७००० चे वर आहे.येथे दोन अनुदानीत विदयालये,लगतच्या मिंडाळा या गावात महाविद्यालय आहे.परिसरातील पारडी,नवेगाव,परसोडी,मेंढा,मिंडाळा अशा अनेक गावांचा संपर्क व व्यवहाराचे केंद्र येथेच आहे.परिसरातील बहुतांश नागरीक रेल्वेत नोकरी करतात. मात्र परिसरात ए.टी.एम. सुविधा नसल्याने दूर अंतरावर तालुक्याचे ठिकाणी पैशासाठी पायपीट करावी लागते.परिसरात अनेक बचतगटे,लहान उदयोग,शेतकरी यांना सोईचे व्हावे,त्रास कमी व वेळेची बचत व्हावी या हेतूने ग्राम पंचायत नवेगाव पांडव तर्फे या ग्रामीण परिसरातील ऐकमेव बैकेत ए.टी.एम.ची मागणी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचेकडे
केली.चर्चेअंती अध्यक्षांनी या जनहिताच्या मागणीची दखल घेत अधिकाऱ्यांना पाहणी करण्याची सुचना दिली. यावेळी नवेगाव पांडव येथील निवासी प्रा.महेश पानसे, श्रीमती इंदिराताई नवघडे व ग्रा.प.कर्मचारी उपस्थित होते.

संतोषसिंह रावत यांच्या सुचनेनुसार संपूर्ण तांत्रिक बाबींची पूर्तता होऊन दोन ते तीन महिन्यात नवेगाव पांडव येथे ए.टी.एम.सुविधा उपलब्ध होऊन परिसरातील शेतकरी,महीला,कमंचारी व असंंख्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल.अशी आशा सरपंच एड.शमिंला रामटेके यांनी व्यक्त केला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये