ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘क्ष’ रुग्णाना पोषक आहाराचे भाजपा गडचांदूर कडून वितरण!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

गडचांदूर :- देश्याचे पंतप्रधान मा.नरेन्द्रजी मोदी यानी सन २०२५ पर्यंत देश्यातुन क्षय रोग मुक्त भारत करण्याचे ठरविले आहे यात लोक सहभाग म्हणून समाजसेवी संस्था दानशुर व्यक्तींना आव्हान केले आहे. त्या दृष्टिकोनातून आरोग्य विभागाकडून क्षय रोग रुग्णाचे शोध घेवून त्याना उपचार चालू केला आहे.परंतु सदर रुग्णाना ओषधि सोबत पोषक आहार आवश्यक असतात परंतु क्ष रुग्णांची आर्थिक परिस्थिति हलाखिची असल्यासने ते पोषक आहार घेवू शकत नाही. तेव्हा कोरपणा तालुका आरोग्य अधिकारी श्री टेंम्भे साहेबानी क्ष रुग्णाना दत्तक घेवून सहा महीने पोषक आहार पुरविण्या करीता सामाजिक कार्यकर्त्यानी तसेच संस्थानी,राजकीय पक्ष्यानी पूढ़े यावे असे आव्हान केले होते.

            त्यांच्या आव्हानाची दखल घेत भारतीय जनता पार्टी गडचांदूर कडून शहरातील जेवढे रुग्ण निघतील ते सर्व रुग्ण दत्तक घेण्याचे ठरविले आहे.

तालुका आरोग्य विभागाने शोध घेतला असता आज पर्यंत १० रुग्ण आधळले त्यांना दिनांक २६जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टी गडचांदुर कडून पोषक आहार किट चे वाटप करण्यात आले.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी श्री टेंभे साहेब व त्यांची चमू तसेच भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष श्री सतीश भाऊ उपलेंचवार, नगरसेवक श्री अरविंद डोहे,श्री रामसेवक जी मोरे,अरविंद जी कोरे,संदीप जी शेरकी,शिवाजी सेलोकर,अजीम बेग,विश्वंभर झाम,लींगुजी कांठले,गजानन शिंगरू,गंगाधर खंडाळे यादिंची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये