चोडी (शेत शिवार) गावठी मोहा दारू भट्टीचा अड्डा उध्वस्त
एकूण 2 लाख 57 हजारावर माल नाश करून आरोपी विरुद्ध कार्यवाही
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
या प्रमाणे आहे की, मुखबीर चे खबरे वरून पंच व पो स्टाफ सह यातील नमुद आरोपीवर मौजा चोडी(शेत शिवार) येथे गावठी मोहा दारू चे अड्यावर प्रो.रेड केला असता, त्यावर मोक्यावरून1) 12 लोखंडी ड्रम मध्ये 2400 लीटर कच्चा मोहा सडवा रसायन ड्रमसह किं. 2,52,000/-रु 2) 02 लोखंडी भट्टीचे खाली ड्रम कि.2000/-रु. 3) इतर भटी साहित्य कि.3000/-रु.जु. किं.2,57,000/-रु.चा माल जप्त करून कार्यवाही केली. आरोपी जगदीश बागर, रा.सावलापुर , ता. आर्वी ,जि वर्धा (पसार) विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री नूरूल हसन यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड यांचे निर्देशाप्रमाणे स फ़ौ संतोष दरगुडे पो हवा भूषण निघोंट ना पोशी विकास अवचट राकेश आस्तानकर हर्षल सोनटक्के यांनी केली.