ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धाबा ग्रामपंचायतीच्या २० लाखांच्या लेखापरीक्षण आक्षेपांवर कारवाईची मागणी

रामकृष्ण सांगळे यांची गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ तालुक्यातील धाबा ग्रामपंचायतीच्या सन २०२४-२५ च्या लेखापरीक्षणात सुमारे २० लाख रुपयांचे आर्थिक आक्षेप नोंदविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई तसेच रकमेची वसुली करण्याची मागणी गोंडपिपरी तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण सांगळे यांनी १ ऑक्टोबर २०२६ रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती गोंडपिपरी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून मागणी केली आहे.

 लेखापरीक्षणात आक्षेप नोंदविल्यानंतरही संबंधितांवर अद्याप कारवाई झालेली नसून, रक्कम वसुलीचे आदेशही काढण्यात आलेले नसल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

लेखापरीक्षणातील आक्षेपांची चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, शासनाचे नुकसान झाले असल्यास नियमानुसार रक्कम वसूल करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सांगळे यांनी केली आहे.

या प्रकरणात लेखापरीक्षणातील २० लाख रुपयांच्या आक्षेपांचे नेमके स्वरूप काय आहे, कोणाची जबाबदारी निश्चित होते आणि प्रशासनाकडून पुढे कोणती कार्यवाही केली जाते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, लेखापरीक्षणातील आक्षेप म्हणजे भ्रष्टाचार सिद्ध झाल्याचा अंतिम निष्कर्ष नसतो. संबंधितांकडून खुलासा व प्रशासकीय चौकशीनंतरच जबाबदारी निश्चित होऊ शकते असे जानकार लोकांचे म्हणे असले तरी शेवटी गटविकास अधिकाऱ्यांकडून या तक्रारीवर होणारी कार्यवाही महत्त्वाची ठरणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये